
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम सध्या मिचेल मार्श याच्या नेतृत्वात न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलिया या न्यूझीलंड दौऱ्यात टी 20I मालिका खेळत आहे. उभयसंघातील या टी 20I मालिकेत एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहे. पाहुण्या ऑस्ट्रेलियाने या मालिकेत विजयी सलामी दिली. ऑस्ट्रेलियाने बुधवारी 1 ऑक्टोबरला न्यूझीलंडवर 6 विकेट्सने धुव्वा उडवत विजयी सुरुवात केली. त्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना हा 3 ऑक्टोबर रोजी बे ओव्हल, माऊंट माउंगानुई येथे आयोजित करण्यात आला होता.