
आयसीसी वनडे वूम्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील अकराव्या सामन्यात शुक्रवारी न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या मोहिमेतील तिसरा सामना असणार आहे. बांगलादेशने पाकिस्तानला पराभूत करत मोहिमेची सुरुवात विजयाने केली होती. मात्र त्यानंतर बांगलादेशला इंग्लंडकडून पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे बांगलादेशचा न्यूझीलंड विरुद्ध विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न असणार आहे.
तर दुसर्या बाजूला न्यूझीलंडसाठी करो या मरो अशी स्थिती आहे. न्यूझीलंडला पहिल्या दोन्ही सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने 1 ऑक्टोबरला न्यूझीलंडला 89 धावांनी पराभूत केलं होतं. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने किवीचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला होता. त्यामुळे आता न्यूझीलंडला या मोहिमेतील आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर कोणत्याही स्थितीत शुक्रवारी सामना जिंकावाच लागणार आहे.
सोफी डीव्हाईन ही न्यूझीलंडचं नेतृत्व करणार आहे. निगर सुल्ताना हीच्याकडे बांगलादेशच्या कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. उभयसंघातील हा सामना कधी आणि कुठे पाहायला मिळणार? हे आपण जाणून घेऊयात.
न्यूझीलंड वूमन्स विरुद्ध बांगलादेश वूमन्स सामना केव्हा?
न्यूझीलंड वूमन्स विरुद्ध बांगलादेश वूमन्स सामना शुक्रवारी 10 ऑक्टोबरला होणार आहे.
न्यूझीलंड वूमन्स विरुद्ध बांगलादेश वूमन्स सामना कुठे?
न्यूझीलंड वूमन्स विरुद्ध बांगलादेश वूमन्स सामना गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.
न्यूझीलंड वूमन्स विरुद्ध बांगलादेश वूमन्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
न्यूझीलंड वूमन्स विरुद्ध बांगलादेश वूमन्स सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होईल. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
न्यूझीलंड वूमन्स विरुद्ध बांगलादेश वूमन्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
न्यूझीलंड वूमन्स विरुद्ध बांगलादेश वूमन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
न्यूझीलंड वूमन्स विरुद्ध बांगलादेश वूमन्स सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
न्यूझीलंड वूमन्स विरुद्ध बांगलादेश वूमन्स मॅच मोबाईल आणि लॅपटॉपवर जिओहॉटस्टार एपद्वारे पाहायला मिळेल.