
मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर गेलेल्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना त्यांच्या पक्षांच्या शिस्तीच्या कठोर नियमांचा सामना करावा लागला. उशीरा पोहचल्याने शिक्षा म्हणून राहुल गांधी यांनी १० पुशअप कराव्या लागल्या. पंचमढीमध्ये आयोजित काँग्रेस जिल्हा अध्यक्षांच्या प्रशिक्षण सत्रा दरम्यान उशीरा येणाऱ्यांना अनोखी शिक्षा देण्याचा पायंडा पाडला होता. उशीरा येणाऱ्याचे स्वागत टाळ्या वाजून त्यांना ‘टाईम मॅनेजमेंट’ महत्व कळावे, आणि प्रतिकात्मक शिक्षाही दिली जात होती. राहुल गांधी स्वत:च २० मिनिटे उशीरा पोहचल्याने त्यांनी हसत शिक्षा कबुल केली आणि वातावरण हलके फुलके केले.
या सत्रात शनिवारी राहुल गांधी सामील झाले. परंतू ते २० मिनिटे उशीरा आले, त्यावर काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिराचे प्रमुख सचिन राव यांनी मजेत म्हटले की उशीरा येणाऱ्यांना शिक्षा केली जाते. यावर राहुल यांनी विचारले की काय शिक्षा आहे ? त्यांनी सांगितले उशीरा येणाऱ्याला १० पुशअप काढाव्या लागतात. त्यानंतर राहुल यांनी कोणताही उशीर न करता १० पुशअप मारुन दाखवल्या.
त्यानंतर ठरलेल्या कार्यक्रमांतर्गत राहुल गांधी यांनी प्रशिक्षण शिबिराला संबोधित केले. आणि काँग्रेसच्या नव्या जिल्हाध्यक्षांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.
बीजेपीवर ‘व्होट चोरी’चा आरोप
पंचमढीत राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपा आणि निवडणूक आयोगावर कायम ठेवला. त्यांनी निवडणूक आयोगावर मोठ्या प्रमाणात अनियमितता केल्याचा आरोप केला आणि मध्य प्रदेशातही अशाच प्रकारचा गोंधळ आयोगाने केला असल्याचा आरोप केला.
राहुल गांधी म्हणाले की काही दिवसांपूर्वी मी हरियाणा मॉडेल सादर केले होते. २५ लाख व्होट चोरी झाले होतो. प्रत्येक आठ मतदारांपैकी एक व्होट चोरले होते. ही यांची व्यवस्था आहे. मुख्य मुद्दा ‘व्होट चोरी’ आहे. आमच्याजवळ पुरावे आहेत आणि आम्ही एक- एक करुन जाहीर करणार आहोत. या आरोपांना भाजपा आणि निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळले आहेत.
बीजेपीची टीका, राहुल हे ‘लीडर ऑफ पर्यटन’
या दरम्यान भाजपाने राहुल गांधी यांच्यावर टीका करताना म्हटले की बिहार निवडणूक प्रचारात राहुल सुट्टीवर होते. भाजपाचे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी एक्स पोस्ट करत म्हटले की, ‘राहुल गांधी यांच्यासाठी विरोधी पक्ष नेता (LoP) म्हणजे ‘लीडर ऑफ पर्यटन (Paryatan)’ आणि पार्टी करणे आहे.
त्यांनी टीका करताना म्हटले की जेव्हा बिहारात निवडणूक सुरु आहे, राहुल गांधी पंचमढीत जंगल सफारीचा आनंद घेत आहेत. पुनावाला यांनी गालिब यांच्या ओळी बदलून म्हटले यावरुन त्यांची प्राथमिकता कळते. आणि निवडणूक हरल्यानंतर ते ईसीआयला दोष देतील.