-
नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका 7 वर्षाच्या चिमुकलीवर शिक्षकाने आत्याचर केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार नांदेड शहरातच घडला आहे. नांदेड शहातील एका इंग्रजी शाळेत चिमुकली शिक्षण घेत होती.
-
मिळालेल्या माहितीनुसार नांदेड शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या 7 वर्षाच्या चिमुकलीवर त्याच शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षकाने अत्याचार केला. ही घटना 19 नोव्हेंबर रोजी घडली आहे. आज सदरील मुलगी ही शाळेत जाण्यासाठी नकार देत होती, त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.
-
मुलीने शाळेत जाण्यास नकार दिल्यानंतर तिच्या मुलीच्या विचारपूस केली. त्यानंतर शिक्षकाने केलेला प्रकार मुलीने आपल्या आईला सांगितला. हे घृणास्पद कृत्य समोर आल्यानंतर मुलीच्या आईने भाग्यनगर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे.
-
या तक्रारीवरून त्या शिक्षकावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(2), 65(2) ,351(2) अंतर्गत तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यातील कलम 468 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपी विशाल लोखंडे या शिक्षकास अटक करण्यात आली आहे.
-
हा प्रकार समोर आल्यानंतर नांदेड शहरात संताप व्यक्त केला जात आहे हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची विनंती पोलीस न्यायालयाला करणार आहेत. तशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजंने यांनी दिलीय. त्यामुळे या प्रकरणात नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




