-
सिने जगतातील प्रेम, लव्ह अफेअर्सची नेहमीच चर्चा असते. विशेष म्हणजे या क्षेत्रात कलाकार जेवढ्या लवकर एकमेकांच्या प्रेमात पडतात, तेवढ्याच लवकर लग्नानंतर त्यांचा घटस्फोटही होतो. आतापर्यंत याची अनेक उदाहरणे समोर आलेली आहेत.
-
सिनेजगतात मोठं नाव असलेली संजीदा शेख ही अभिनेत्री तर लग्नानंतर एका अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती, असे म्हटले जाते. पुढे संजीदाचा घस्फोटही झाला होता. विशेष म्हणजे संदीजाचे नाव जेव्हा या अभिनेत्यासोबत जोडले जात होते, तेव्हा तिला एक मुलगीदेखील होती.
-
मिळालेल्या माहितीनुसार संजीदा हिचे नाव बॉलिवुडचा आघाडीचा अभिनेता हर्षवर्धन राणे याच्यासोबत जोडले जात होते. ते दोघेही नात्यात आहेत, असे म्हटले जायचे. या चर्चेला जेव्हा सुरुवात झाली होती, तेव्हा संजीदाचे लग्नदेखील झालेले होते. संजीदाने अगोदर बरीच वर्षे अमीर अली याला डेट केले होते.
-
दोघांचाही एकमेकांवर विश्वास बसल्यानंतर संजीदा आणि अमीर अली यांनी 2012 साली लग्न केले. लग्नानंतर सरोगसीच्या माध्यमातून या दोघांना एक मुलगी झाली. पण त्यांचे हे लग्न फार काळ टिकू शकले नाही.
-
संजीदा आणि अमीर आली यांचा 2020 साली वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुढची दोन वर्षे हे दोघेही विभक्त राहात होते. 2022 साली त्यांचा घटस्फोट झाला. या दोघांच्या घटस्फोटाचे कारण संजीदाची हर्षवर्धन राणेसोबतची जवळीक असल्याचा दावा केला जातो.
-
हर्षवर्धन राणे आणि संजीदा 2020 साली एकमेकांच्या फार जवळ आले होते, असे बोलले जाते. त्यानंतर या दोघांच्या अफेअरची सगळीकडे चर्चा चालू झाली होती. दोघेही गीरमध्ये सुट्ट्या घालवताना एकत्र दिसले होते. नंतर मात्र दोघांनीही त्यांच्या अफेअरच्या चर्चा फेटाळल्या होत्या.





