
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून टॅरिफच्या माध्यमातून सर्वांना धमकावताना दिसत आहेत. भारतासह ब्राझीलवर त्यांनी मोठा टॅरिफ लावला. टॅरिफच्या मुद्द्यावरून अनेक देशांसोबतचे त्यांचे संबंध खराब झाल्याचे सध्या दिसतंय. कॅनडा आणि अमेरिका यांच्यातीलही संबंध फार काही चांगले राहिले नाहीत. काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात एक जाहिरात चालवण्यात आली, ही जाहिरात पाहून डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडावर थेट 10 टक्के टॅरिफ लावण्याचा धक्कादायक असा निर्णय घेतला. त्या जाहिरातीनंतर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज झाले होते. ट्रम्प यांच्या निर्णयाने कॅनडाला मोठा फटका बसला.कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी शनिवारी आपली माफी मागितल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.
कॅनडातील जाहिरात ओंटारियो कंझर्व्हेटिव्ह नेते डग फोर्ड यांनी केली होती, जे अनेकदा स्वतःला ट्रम्पसारखे नेते म्हणून वर्णन करत होते. त्या जाहिरातीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे जुने विधान जबाबदारीमुळे व्यापार युद्धे आणि आर्थिक विनाश होतो, असे म्हटले होते. या जाहिरातीनंतर डोनाल्ड ट्रम्प इतके जास्त भडकले की, त्यांनी कॅनडावर 10 टक्के टॅरिफ वाढवत सर्व व्यापार चर्चा बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला.
कॅनडा यांनी नुकताच सांगितले की, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी माझ्याकडे माफी मागितली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, माझ्या विधानाला चुकीच्या पद्धतीने दाखवले जात होते. ज्यावरून असे वाटतं की, टॅरिफच्या विरोधात आहे. पत्रकारांसोबत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, मार्क कार्नी हे खूप जास्त चांगले आहेत. त्यांनी माझ्याकडे माफी मागितली आहे. ती एक खोटी जाहिरात होती.
रेगनचे खरे शब्द मोडून तोडून दाखवण्यात आली. खरोखरच असे व्हायला नाही पाहिजे, त्यांनी माफी मागितली याचे मला काैतुक आहे. आता कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी माफी मागितल्यानंतर हा विषय संपल्याचे त्यांनी म्हटले आहे. एका जाहिरातीमुळे कॅनडा आणि अमेरिकेतील संबंध तणावात असल्याचे मागील काही दिवसांपासून बघायला मिळाला. शेवटी कॅनडाच्या पंतप्रधानांना डोनाल्ड ट्रम्प यांची माफी मागावी लागली.