
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच भारताच्या दाैऱ्यावर येण्याचे संकेत दिले. डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी जाहीर केले की, यावर्षी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या G20 शिखर परिषदेत कोणताही अमेरिकन सरकारी अधिकारी सहभागी होणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय तडकाफडकी घेतला. डोनाल्ड ट्रम्प यांनी या G20 शिखर परिषदेत सहभागी न होण्याचे कारण सांगत म्हटले की, दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने आफ्रिकन लोकांवर केलेल्या गैरवर्तनामुळे हा निर्णय घेतला. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या G20 शिखर परिषदेत कोणताही अमेरिकन अधिकारी सहभागी होणार नाहीये. कारण सध्या दक्षिण आफ्रिकेत ज्याप्रकारे श्वेत शेतकऱ्यांना वागवले जात आहे, ते चुकीचे आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला दावा खोटा असल्याचे दक्षिण आफ्रिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले असून हा दावा फेटाळून लावला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, G20 शिखर परिषद दक्षिण आफ्रिकेत होणार हे खरोखर खूपच जास्त अपमानजनक आहे. त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील श्वेत शेतकऱ्यांसोबत चुकीचा व्यवहार केला आहे. त्यांच्या शेती बळकावल्या आणि त्यांच्यावर अत्यंत घातक हल्ले केली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेच्या सरकारवर गंभीर आरोप करत त्यांनी श्वेत शेतकऱ्यांसोबत भेदभाव करत त्यांना त्रास दिल्याचे म्हटले. दक्षिण आफ्रिकेच्या प्रशासनाने घोषणा केली की, ते दरवर्षी 7,500 निर्वासितांच्या शरणार्थी प्रवेशात मोठी कपात करतील, ज्यामध्ये श्वेत दक्षिण आफ्रिकन लोकांना प्राधान्य दिले जाईल. त्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प सातत्याने दक्षिण आफ्रिकेच्या सरकावर आरोप करताना दिसत आहेत.
ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यानंतर अध्यक्ष सिरिल रामाफोसा म्हणाले की, त्यांनी ट्रम्प यांना सांगितले की श्वेत शेतकऱ्यांच्या छळाचे अहवाल पूर्णपणे खोटे आहेत. त्यांनी ट्रम्प यांचा दावा खोटा असल्याचेही म्हटले. राजनैतिक तणाव असूनही ट्रम्प आपल्या म्हणण्यावर पूर्णपणे ठाम आहेत. मियामी येथे दिलेल्या भाषणात ट्रम्प यांनी थेट दक्षिण आफ्रिकेला G20 मधून काढून टाकले पाहिजे, असे थेट म्हटले आहे.