Gulabrao Patil : महिलांबद्दल हे काय बोलून गेले गुलाबराव? घराबाहेर खाटा टाकून झोपा लक्ष्मी येणारे.. सारवासारव करायला गेले अन्… वादाच्या भोवऱ्यात - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 28, 2025

Gulabrao Patil : महिलांबद्दल हे काय बोलून गेले गुलाबराव? घराबाहेर खाटा टाकून झोपा लक्ष्मी येणारे.. सारवासारव करायला गेले अन्… वादाच्या भोवऱ्यात

मंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘लक्ष्मी’ संबंधी केलेल्या विधानावरून महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वाद निर्माण झाला आहे. ‘एक तारखेला घराबाहेर खाटा टाकून झोपा, लक्ष्मी येणार आहे’ असे विधान त्यांनी केले होते. यावर टीका सुरू झाल्यानंतर पाटील यांनी स्पष्टीकरण दिले की, ‘लक्ष्मी’ म्हणजे केवळ पैसे नव्हे, तर आई-बहिणीसुद्धा असतात. मात्र, जर ‘लक्ष्मी’चा अर्थ आई-बहिणी असा होता, तर ‘घराबाहेर खाटा टाकून झोपण्या’चा संदर्भ कशासाठी होता, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या सारवासारवीमुळे विरोधक अधिकच आक्रमक झाले असून, त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. गुलाबराव पाटील यांना या विधानावर पुन्हा स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.