पावसाचे संकट कायम, तब्बल इतक्या राज्यात मुसळधार पाऊस, थेट इशारा.. - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, December 31, 2025

पावसाचे संकट कायम, तब्बल इतक्या राज्यात मुसळधार पाऊस, थेट इशारा..

पावसाचे संकट कायम, तब्बल इतक्या राज्यात मुसळधार पाऊस, थेट इशारा..

राज्यासह देशातील वातावरण सातत्याने बदलताना दिसत आहे. कुठे कडाक्याची थंडी तर कुठे मुसळधार पाऊस सुरू आहे. मॉन्सून देशातून जाऊन काही महिने पूर्ण झाली. मात्र, तरीही पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाहीये. ऐन 1 जानेवारी 2026 रोजीही जोरदार पाऊस काही भागात पडणार आहे. राज्यात गेल्या महिनाभरापासून थंडीचा कडाका आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरीमुळे गारठा वाढताना दिसतोय. अनेक जिल्ह्यांमध्ये पारा चांगलाच घसरल्याचे बघायला मिळत आहे. राज्यात पुढील काही दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे. परभणी जिल्ह्यात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. परभणीत 6.3 अंश सेल्सिअस तापमान होते. धुळे येथे 6.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. निफाड 6.8 अंश सेल्सिअस तापमान, यवतमाळ, अहिल्यानगर, गोदिंया, यवतमाळ आणि नागपूर येथे 9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. पुढील काही दिवस परभणीसह निफाड आणि धुळ्यात थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत देशाच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. एका नवीन पश्चिमी वाऱ्याच्या प्रभावामुळे हवामानात मोठा बदल झाला. उंच डोंगराळ प्रदेशात पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. सततच्या हवामानातील बदलामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात.

31 डिसेंबरच्या रात्री पंजाब, हरियाणा, चंदीगड येथे दाट ते खूप दाट धुके पडण्याची शक्यता आहे आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये 1 जानेवारी 2026 पर्यंत धुक्याचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा आहे. 31 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान जम्मू- काश्मीर, लडाख, गिलगिट आणि मुझफ्फराबाद येथील काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे.

1 जानेवारी 2026 रोजी पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये आणि 31 डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 31 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांमध्येही पावसाची शक्यता आहे. थोडक्यात काय तर कुठे कडाक्याची थंडी आहे तर कुठे सतत पाऊस बघायला मिळतो. काही शहरात प्रचंड प्रदूषणही वाढले आहे.