Heavy Rain Alert : 72 तास धोक्याची, या राज्यात हाय अलर्ट, ढगाळ वातावरणासह… - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, December 3, 2025

Heavy Rain Alert : 72 तास धोक्याची, या राज्यात हाय अलर्ट, ढगाळ वातावरणासह…

Heavy Rain Alert : 72 तास धोक्याची, या राज्यात हाय अलर्ट, ढगाळ वातावरणासह…

राज्यात कधी गारठा तर कधी पाऊस अशी स्थिती निर्माण झाली आहे. यासोबतच हवा देखील खराब श्रेणीत आहे. मुंबईत मागील काही दिवसांपासून वायू प्रदूषणात मोठी वाढ झाली. चक्रीवादळामुळे देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. मुंबई पाठोपाठ आता पुण्याची हवा खराब श्रेणी आहे. गेल्या काही दिवसापासून पुण्याची हवा अधिकच विषारी होत चालली आहे. शहरातील शिवाजीनगर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरासह अनेक भागात हवेची गुणवत्ता खराब ते अत्यंत खराब श्रेणीत नोंदवण्यात आली आहे. भारत हा जगातील पाचवा सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे, राज्यातील अनेक शहरात पीएम 2.5 आणि पीएम 10 कणांचे प्रमाण धोकादायक पातळीवर गेले आहेत. वायू प्रदूषणामुळे लोकांच्या आरोग्याचीही समस्या निर्माण झाली आहे.

उत्तरेकडे थंडी वाढताना दिसत आहे. उत्तरेकडून राज्यात थंड वारे येत असल्याने गारठा अधिकच वाढला आहे. हेच नाही तर संपूर्ण महिनाभर राज्यात थंडीच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वीच देशातील काही भागात मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसानंतर आता थंडी वाढत आहे. अनेक राज्यांमध्ये अजूनही पाऊस सुरूच आहे. पावसाचे ढग काही ठिकाणी कायम आहेत.

भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 72 तासांसाठी देशभरातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. मॉन्सून देशात दाखल झाल्यापासून ते आतापर्यंत केरळमध्ये सतत पाऊस पडताना दिसत आहे. पुढील 72 तासांमध्ये केरळमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. चक्रीवादळामुळेही मोठा पाऊस केरळमध्ये झाल्याचे बघायला मिळाले.

आता पुन्हा एकदा हवामानाचा तमिळनाडूवर परिणाम होणार आहे. तामिळनाडूमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामध्ये राज्यात हुडहुडी कायम राहिल. आज दिवसभर राज्यात ढगाळ वातावरण असेल. मराठवाडा आणि विदर्भात गारठा अधिक वाढेल. आहिल्यानगर, जेऊर आणि भंडाऱ्यात पारा कमी झाला. राज्यातील अनेक शहरांमध्ये पारा 10 अंशांच्या खाली गेला. पुढील काही दिवसात थंडीचा तडाखा अजून बसण्याची शक्यता आहे.