
विराट कोहली आणि रोहित शर्मा या अनुभवी जोडीने 30 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात निर्णायक खेळी करुन भारताला विजयी करण्यात प्रमुख भूमिका बजावली होती. मात्र ही जोडी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरणार असल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होतंय. त्यामुळे सामन्याआधी भारतीय क्रिकेट चाहत्यांची चिंता वाढली आहे.