
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे आज मतदान आहे. मतदानाला सुरूवात झाली असून काल प्रचार शिगेला पोहोचला होता. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी या निवडणुकीची करण्यात आली. आरोप प्रत्यारोपाचे सत्र रंगताना दिसले. सर्व मतदान केंद्रांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार, पुणे जिल्ह्यातील 12 नगरपरिषद आणि 3 नगरपंचायतींसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सुमारे 6.3 लाख नोंदणीकृत मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सज्ज झाले आहेत. राज्यात सर्वच ठिकाणी मतदानाची प्रक्रिया शांततेत आणि सुरक्षित पार पडावी, यासाठी आवश्यक ते सर्व नियोजन करण्यात आले आहे. या निवडणुकीचा निकाल बुधवारी मतमोजणीनंतर जाहीर होणार आहे. राज्यभरातील एकूण 264 नगरपरिषदा आणि नगर पंचायतींसाठी मतदान होणार आहे.