
Latur Nagar Nigam Result Congress Win : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचे निकाल आले असून काहींसाठी ते अतिशय धक्कादायक आहेत. सगळीकडे सध्या भाजपचाच बोलबाला आहे. मुंबई ते नाशिकपर्यंत अनेक महानगरपालिकांमध्ये काँग्रेस पक्षाला पराभव पत्करावा लागला आहे, मात्र असं असलं तरी लातूर, मराठवाड्यात पक्षाने अपवादात्मक कामगिरी केली आहे. एवढझंच नव्हे तर लातूर महापालिकेत (Latur Municipal Corporation)काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवत त्यांचा गड राखला आहे.
खरं तर, लातूरमध्ये काँग्रेसने 90 पैकी 43 जागा जिंकल्या. या प्रचंड विजयावरून हे सिद्ध होते की देशमुख कुटुंबाच्या वारशाची जादू अजूनही येथे कायम आहे. लातूर हा काँग्रेस पक्षासाठी एक अजिंक्य बालेकिल्ला आहे. लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी भाजपची रणनीती उधळून लावली आहे. काँग्रेसने 43 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले. तिथे आता काँग्रेसचा महापौर बसणार आहे. जंग जंग पछाडूही भारतीय जनता पक्षाला तिथे फक्त 22 जागाच जिंकता आल्या.
अशी आहे आकडेवारी
काँग्रेस – 43 जागा ( स्पष्ट बहुमत)
भाजप – 22 जागा
वंचित बहुजन आगाडी – 04 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट – 00 जागा
शिवसेना (ठाकरे गट) – 00 जागा
शिवसेना ( शिंदे गट) – 00 जागा
लातूरमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय
राज्याचे माजी मुख्यमंत्री, स्व. विलासराव देशमुख यांचा वारसा लातूरमध्ये काँग्रेसच्या प्रचंड विजयासाठी जबाबदार आहे. हे क्षेत्र त्यांचे मूळ गाव आहे आणि गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. माजी मुख्यमंत्री असलेल्या विलासरावांची इथली पाळंमुळं घट्ट होती आणि स्थानिकांशी खोलं नातं होतं. याचा प्रत्यय आजही निवडणुकीच्या निकालातून दिसून येतोय. भाजपच्यालाटेलाही हे कौटुंबिक आणि भावनिक नातं तोडता आलं नाही असा राजकीय विश्लेषकांचं मत आहे.
भाजप प्रदेशाध्यक्षांचा वाद
महापालिका निवडणुकीच्या अगदी आधी लातूरमध्ये प्रचारासाठी आलेले भाजप प्रदेशाध्यक्ष, रविंद्र चव्हाण वादात अडकले होते. त्यामुळे लातूर हे राजकीय अखाडा बनले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण येथे खूप सक्रिय होते पण प्रचारादरम्यान त्यांच्या एका विधानाने मोठा गदारोळ माजला. विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसून टाकू अशा आशयाचे विधान त्यांनी केले आणि क्षोभ उसळला. त्याचा फटकही भाजपला लातूरमध्ये बसल्याची शषक्यता नाकारता येत नाही.
आणखी दोन महापालिकांत काँग्रेसचा विजय
लातूर व्यतिरिक्त, या दोन इतर ठिकाणीही काँग्रेसला “हात” मिळाला आहे. केवळच नाही तर इतर दोन ठिकाणांनीही काँग्रेससाठी आनंदाची बातमी आहे. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या जागेवरही काँग्रेसने चांगली कामगिरी केली आणि आपले वर्चस्व प्रस्थापित केले. तर चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (UBT) सोबत युती करून विजय मिळवला.