UMC Election Results 2026 LIVE: उल्हासनगरच्या प्रभाग 13मध्ये कोणता पक्ष ठरणार वरचढ? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, January 16, 2026

UMC Election Results 2026 LIVE: उल्हासनगरच्या प्रभाग 13मध्ये कोणता पक्ष ठरणार वरचढ?

UMC Election Results 2026 LIVE: उल्हासनगरच्या प्रभाग 13मध्ये कोणता पक्ष ठरणार वरचढ?

उल्हासनगर महानगरपालिकेच्या (UMC election 2022) रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सध्या सगळीकडे राजकीय वातावरण तापले आहे. यंदा उल्हासनगरात कोण बाजी मारणार याविषयी तर्क वितर्क लावले जात आहेत. 78 जागांच्या या महापालिकेत 2017मध्ये 32 जागा जिंकत भाजपाने (BJP) सत्ता स्थापन केली होती. आता 2026 मध्ये येथे कोणाची सत्ता येणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया प्रभाग 13 मध्ये काय परिस्थिती आहे.

लोकसंख्या आणि आरक्षण

प्रभाग क्रमांक 13 ची एकूण लोकसंख्या 24097 इतकी आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती 6562 आहेत तर अनुसूचित जमाती 289 आहेत. या प्रभागातील आरक्षाविषयी बोलायचे झाले तर 13 अ अनुसूचित जातीला आरक्षण आहे. 13 ब मध्ये महिला मागासवर्ग, 13 क मध्ये सर्वसाधारण महिला आणि 13 ड मध्ये सर्वसाधारण असे आरक्षण देण्यात आले आहे. आता यंदा या प्रभात कोणाची सत्ता असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विजयी उमेदवार (2017)

मागील वेळी याठिकाणी शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला होता. शिवसेनेचे स्वप्नील मिलिंद बागुल यांनी बाजी मारली होती.

प्रभाग 13 ची व्याप्ती

उल्हासनगर प्रभाग क्रमांक 13 ची सुरुवात आम्रपाली नगर, बुद्ध कॉलनी, पंचशील नगर, कानसाई धुधाजवळ बुद्ध विहार, अंबिका नगर, टागोर सोसायटी, लेप्रसी कॉलनी, ओएलपीएस चर्च, होली फॅमिली कॉन्व्हेंट एरिया, उत्कर्ष नगर, होली फॅमिली मेथोडिस्ट चर्च, श्री गजानंद वडापाव, श्री अय्यप्पा पूजा समिती, राहुल नगर, महाबोधी बुद्ध विहार, दत्तगुरु सोसाग्रटी, शिवसेना ऑफिसए संभाजी चौकाजवळील कार्यालय, पाच पांडव कॉलनी, ब्राह्मण पाडा, अंगण लॉन्स, माने प्रकाश चाळ, पटेल आर मार्ट ते लाल चक्की चौकपर्यंत आहे.

उत्तर – मुंबई पुणे रेल्वे लाईन, न्यु नॅशनल हेअर सलुन ते वालधुनी नदी महानगरपालिका पुर्वेकडील हद्द

पूर्व- वालधुनी नदी महानगरपालिका पुर्वेकडील हद्द, मुंबई पुणे रेल्वे रेषेपासून भारत नगर, कानसई रस्त्यावरील पुलापर्यंत.

दक्षिण- कानसई रोड भरत नगर, अॅड. हेमंत वानखेडे. वानखेडे कार्यालयाकडे वळून, सूर्यवंशी मेडिकलजवळील, डॉ. आंबेडकर चौक, विमल राज रेसिडेन्सी, जय भीम चौक, सॅल्व्हेशन आर्मी चर्च, छत्रपती संभाजी चौक, ब्राह्मण पाडा रोड, मोक्षबोधी शमशान भूमी, कोतवाल चौकापर्यंत

पश्चिम कोतवाल चौक (मुख्य प्रवेशद्वार) पासून लाल चक्की चौकापर्यंत, लाल चक्की चौकापासून वीर सावरकर चौकापर्यंत, वीर सावरकर चौकापासून स्टेशन रोड मार्गे न्यू नॅशनल हेअर सलूनपर्यंत, मुंबई-पुणे रेल्वे लाईनच्या सीमेपर्यंत

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

उल्हासनगर महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE