-
अंडर 19 टीम इंडियाचा स्टार बॅट्समन वैभव सूर्यवंशी याने आतापर्यंत अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. वैभव सूर्यवंशी सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात आयुष म्हात्रे याच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचं नेतृत्व करत आहे. वैभवने 3 जानेवारीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या यूथ वनडे सामन्यात इतिहास घडवला आहे. वैभवने या सामन्यात 2 वर्ल्ड रेकॉर्ड केले आहेत. (Photo Credit : GETTY)
-
वैभव सूर्यवंशी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मैदानात उतरताच इतिहास घडवला. वैभव सर्वात युवा कर्णधार ठरला. तसेच भारताने हा पहिला सामना जिंकला. यासह वैभवने आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला. वैभव टीमला एकदिवसीय सामना जिंकवणारा सर्वात युवा कर्णधार ठरला आहे. अंडर 19 टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. यासह वैभवच्या नावावर हा महारेकॉर्ड झाला. (Photo Credit : PTI)
-
अंडर 19 टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना जिंकताच वैभव सूर्यवंशी वयाच्या 14 व्या वर्षी यूथ वनडे मॅच जिंकणारा युवा कर्णधार ठरला. वैभवने यासह पाकिस्तानच्या अहमद शहजाद याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. अहमदने पाकिस्तानला वयाच्या 15 वर्ष 141 व्या दिवशी पहिला सामना जिंकून दिला होता. (Photo Credit : PTI)
-
भारताने पहिल्या सामन्यात 50 ओव्हरमध्ये 300 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला प्रत्युत्तरात 27.4 ओव्हरमध्ये 148 धावा करता आल्या. डकवर्थ लुईस नियमानुसार भारताने हा सामना 25 धावांनी जिंकला. (Photo Credit :PTI)
-
विलोमूर पार्क, बेनोनी इथे या सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पाऊस आणि विजांच्या कडकडाटामुळे हा सामना थांबवण्यात आला. खेळाडूंना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं. मात्र पाऊस आणि विजांमुळे सामना पुन्हा सुरु होऊ शकला नाही. आता दुसरा सामना हा 5 जानेवारीला होणार आहे. (Photo Credit :PTI)




