Vastu Shastra : किचनजवळ देवघर का असू नये? पाहा वास्तुशास्त्र काय सांगतं? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, January 8, 2026

Vastu Shastra : किचनजवळ देवघर का असू नये? पाहा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Vastu Shastra : किचनजवळ देवघर का असू नये? पाहा वास्तुशास्त्र काय सांगतं?

वास्तुशास्त्र हे सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा अशा दोन गोष्टींच्या आधारावर कार्य करते, वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात नकरात्मक ऊर्जा वाढते, तेव्हा तुमच्यासह तुमच्या संपूर्ण कुटुंबावर त्यांचा मोठा परिणाम होतो. घरात विविध समस्या निर्माण होतात, जसं की घरावर अचानक एखादं मोठं संकट येणं, काही कारण नसताना घरात वादविवाद वाढणं, अचानक आर्थिक संकट निर्माण होणं, आरोग्याच्या विविध समस्या या सारखी संकट येऊ शकतात. या उलट जर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा असेल तर त्याचा चांगला प्रभाव हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर पडतो, जसं घरातील सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतात. कुटुंबातील सदस्यांचं आरोग्य उत्तम राहतं. घरात आनंदी वातावरण राहतं, वास्तुशास्त्रानुसार तुमचं देवघर कधीही तुमच्या किचनच्या जवळ नसावं, ज्यामुळे ऊर्जेचा संघर्ष पहायला मिळतो आणि त्यातून नकरात्मक ऊर्जा निर्माण होते. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेकमं काय सांगितलं आहे. त्याबद्दल?

किचनजवळ देवघर का नसावं?

किचन आणि देवघर हे आपल्या घरातील दोन अत्यंत महत्त्वाचे भाग असतात. किचन आणि देवघर हे आपल्या घरातील ऊर्जेचे दोन मुख्य स्त्रोत असतात. किचनमधून नेहमी रज आणि तम ऊर्जा बाहेर पडत असते, तर तुमच्या देवघरातून नेहमी सकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते. अशा वेळी जर तुमचं देवघर हे किचन जवळ असेल तर किचनमधून निघणारी ऊर्जा आणि देवघरातून निघणारी ऊर्जा यांचा एक प्रकारचा संघर्ष पहायला मिळतो, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्यास वास्तुदोष निर्माण होतो. त्यामुळे घरातील वास्तुदोष टाळण्यासाठी तुमचं देवघर किचनजवळ नसावं असं वास्तुशास्त्र सांगतं.

देवघराची योग्य दिशा कोणती?

वास्तुशास्त्रानुसार तुमचं देवघर हे नेहमी पूर्ण किंवा पश्चिम देशाला असावं, ते जर ईशान्य दिशेला असेल तर अजूनच उत्तम. कारण ईशान्य दिशा ही देवाची दिशा आहे. तसेच तुमच्या देवघरात एकाच देवाच्या दोन मूर्ती किंवा प्रतिमा असू नयेत, त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांचे फोटो देखील देवघरात ठेवू नयेत, त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. देवघरात शिवलिंग, गणपती आणि तुमच्या कुलदेवतेच्या मूर्ती असाव्यात, असं वास्तुशास्त्र सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)