-
डब्ल्यूपीएल अर्थात वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमाला 9 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी गुजरात जायंट्सला मोठा झटका लागला आहे. स्टार खेळाडूला दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे. धक्कादायक म्हणजे गुजरातला बदली खेळाडू मिळणार नाही. (PHOTO CREDIT- PTI)
-
विकेटकीपर बॅट्समन यास्तिका भाटीया हीला डब्ल्यूपीएलच्या चौथ्या मोसमाला मुकावं लागलं आहे. गुजरात जायंट्सने यास्तिकाला मेगा ऑक्शनमधून 50 लाख रुपये मोजून आपल्या गोटात घेतलेलं. मात्र यास्तिका दुखापतीतून अजूनही पूर्णपणे बरी झालेली नाही. त्यामुळे यास्तिकाला या मोसमातून बाहेर व्हावं लागलं आहे. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)
-
गुजरातसाठी दुहेरी झटका म्हणजे यास्तिक भाटीया हीच्या जागी बदली खेळाडू मिळणार नाही. यास्तिकाला मेगा ऑक्शनआधीच दुखापत झाली होती. बीसीसीआयच्या नियमांनुसार, ऑक्शनआधी दुखापत असलेल्या खेळाडूंच्या जागी दुसऱ्या खेळाडूंना संधी दिली जात नाही. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)
-
यास्तिकाने या स्पर्धेतील पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व केलं. मुंबईने 2 वेळा डब्ल्यूपीएल ट्रॉफी जिंकली आहे. मात्र यास्तिकाला तिसऱ्या मोसमात काही खास करता आलं नाही. त्यामुळे मुंबईने यास्तिकाला मेगा ऑक्शनआधी करारमुक्त केलं होतं. (PHOTO CREDIT- PTI)
-
तर दुसऱ्या बाजूला गुजरात जायंट्सला या स्पर्धेतील पहिल्या तिन्ही मोसमात काही खास करता आलेलं नाही. गुजरात गेल्या हंगामात तिसऱ्या स्थानी राहिली. त्यामुळे गुजरात यंदा ट्रॉफी जिंकण्याच्या तयारीने मैदानात उतरणार आहे. (PHOTO CREDIT- PTI)




