IND vs PAK : पाकिस्तान कोलंबोत टीम इंडिया विरूद्धचा शेवटचा सामना कधीच विसरणार नाही, काय झालं होतं? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, February 14, 2026

IND vs PAK : पाकिस्तान कोलंबोत टीम इंडिया विरूद्धचा शेवटचा सामना कधीच विसरणार नाही, काय झालं होतं?

IND vs PAK : पाकिस्तान कोलंबोत टीम इंडिया विरूद्धचा शेवटचा सामना कधीच विसरणार नाही, काय झालं होतं?

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत 8 मार्चला महाअंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यातील विजेता संघ वर्ल्ड कप चॅम्पियन ठरणार आहे. मात्र त्यासाठी आता बराच वेळ आहे. सध्या साखळी फेरीतील सामने खेळवण्यात येत आहे. त्यामुळे 20 संघात सुपर 8 फेरीसाठी चुरस पाहायला मिळत आहे. मात्र क्रिकेट चाहत्यांना फायनलआधी मकामुकाबला पाहायला मिळणार आहे. या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे. या सामन्यात दुसरं तिसरं कुणी नसून टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. हा सामना रविवारी 15 फेब्रुवारीला होणार आहे. सामन्याला आता काहीच तास बाकी आहेत त्यामुळेच चाहत्यांची उत्सूकता शिगेला पोहचली आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना हा कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडियाचा या मैदानात पाकिस्तान विरुद्ध दबदबा राहिला आहे. पाकिस्तान या मैदानातील टीम इंडिया विरुद्धचा शेवटचा टी 20i सामना कधीच विसरणार नाही. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आर प्रेमदासा स्टेडियम एकमेव टी 20i सामना खेळवण्यात आला आहे. भारताने त्या सामन्यात पाकिस्तानचा एकतर्फी विजय मिळवला होता. त्या सामन्यात नक्की काय झालं होतं? तो सामना केव्हा खेळवण्यात आला होता? भारताला त्या सामन्यात विजयी करण्यात कुण योगदान दिलं होतं? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.