IPL 2026 : मुंबई सहाव्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी सज्ज, जाणून घ्या पलटणची भक्कम आणि पडती बाजू कोणती? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, March 19, 2026

IPL 2026 : मुंबई सहाव्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी सज्ज, जाणून घ्या पलटणची भक्कम आणि पडती बाजू कोणती?

IPL 2026 : मुंबई सहाव्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी सज्ज, जाणून घ्या पलटणची भक्कम आणि पडती बाजू कोणती?

मुंबई इंडियन्स आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील पहिली सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबईने सर्वाधिक 5 वेळा आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. त्यानंतर चेन्नईने पाचव्यांदा आयपीएलचं विजेतेपद जिंकून मुंबईच्या या विक्रमाची बरोबरी केली. आता क्रिकेट चाहत्यांना आयपीएलच्या 19 व्या मोसमाचे वेध लागले आहेत. या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. चाहत्यांना यंदा मुंबईकडून सहाव्या ट्रॉफीची आशा आहे. त्यामुळे पलटण कशी कामगिरी करते याकडे चाहत्यांची करडी नजर असणार आहे. मुंबईच्या टीममध्ये कॅप्टन हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा यासारखे टीम इंडियाची खेळाडू आहेत. अनुभवी खेळाडू असल्याने टीम इंडियाची ताकद सिद्ध होतेच. मात्र मुंबईच्या ताकदीसह पडती बाजू नक्की काय आहे? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.