जिल्हाधिकाऱ्यांचे मोठे आवाहन, पुढील 7 तास मोठा धोका, घराबाहेर पडणे टाळाच, थेट.. - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, April 30, 2026

जिल्हाधिकाऱ्यांचे मोठे आवाहन, पुढील 7 तास मोठा धोका, घराबाहेर पडणे टाळाच, थेट..

जिल्हाधिकाऱ्यांचे मोठे आवाहन, पुढील 7 तास मोठा धोका, घराबाहेर पडणे टाळाच, थेट..

राज्यातील हवामानात मोठा बदल झाला. काल अनेक भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला. त्यामध्येच आज पुन्हा एकदा उष्णता वाढणार आहे. राज्यात उष्णतेने कहर केला. उष्णतेची लाट आहे. सूर्य आग ओकत आहे. आजही राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे. काही भागात ढगाळ वातावरण असेल. अमरावती आणि अकोला येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. 45.2 अंश सेल्सिअसची नोंद झाली. जळगाव, चंद्रपूर, गडचिरोरी, धुळे, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये 44 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. राज्यात आजही उष्णतेची लाट कायम राहणार आहे. 3 त 4 अंशांची घट होऊ शकते. नागरिकांना प्रशासनाकडून काही सूचना देण्यात आल्या. दुपारी 12 ते 4 अतिमहत्वाच्या कामाशिवाय बाहेर पडू नये, असे प्रशासनाकडून नागरिकांना सांगण्यात आले.दुपारी उष्णता वाढणार आहे.

वाढत्या उष्णतेचा थेट नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. भारतीय हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी अतिउष्णतेचा इशारा जारी केल्यानंतर प्रशासन सतर्क मोडवर आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांना उष्माघात टाळण्यासाठी अत्यावश्यक कारणांशिवाय भरदुपारी बाहेर न पडण्याचे आवाहन केले. बाहेर पडताना टोपी,  छत्रीचा वापर करावा तसेच हलके सूती कपडे परिधान करण्याच्या सूचना दिल्या.

जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असून तापमानाचा पारा गेल्या तीन दिवसांपासून तब्बल 42 अंशांवर स्थिर आहे. यंदाच्या हंगामातील उच्चांक म्हणून 43 अंश तापमानाची नोंद झाली असून नागरिक अक्षरशः उकाड्याने हैराण झाले आहेत. येणाऱ्या काही दिवसांत उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार सतर्कतेचे आवाहन करण्यात आले.

उष्माघातावर मात करण्यासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयांची सज्जता. Heat Stroke चा धोका वाढला माणगाव उपजिल्हा रुग्णालयांत विशेष तयारी करण्यात आली. उष्णतेचा प्रकोप वाढताच आरोग्य विभाग सतर्क झाला. औषधांचा मुबलक साठा ठेवण्यात आला. उष्माघात कक्ष 24×7 कार्यरत करण्यात आला. डॉक्टर-परिचारिकांची विशेष नियुक्ती करण्यात आली. रुग्णालयांत आयस पॅक, ORS आणि कोल्ड बॉक्सेसची उपलब्धता वाढवली. उष्माघाताचा वाढता धोका लक्षात घेता आरोग्य विभागाची मोठी तयारी.