RCB vs GT : विराटचा झंझावात, आरसीबीचं विजयी अर्धशतक, गुजरातचा 5 विकेट्सने धुव्वा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, April 25, 2026

RCB vs GT : विराटचा झंझावात, आरसीबीचं विजयी अर्धशतक, गुजरातचा 5 विकेट्सने धुव्वा

RCB vs GT : विराटचा झंझावात, आरसीबीचं विजयी अर्धशतक, गुजरातचा 5 विकेट्सने धुव्वा

अनुभवी फलंदाज विराट कोहली याने केलेल्या 81 धावांच्या चाबूक खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 34 व्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला आहे. आरसीबीने गुजरात टायटन्सवर 5 विकेट्सने मात केली आहे. गुजरातने आरसीबीसमोर 206 धावांचं आव्हान ठेवलं होतं. आरसीबीने हे आव्हान 7 बॉलआधी 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. आरसीबीने 18.5 ओव्हरमध्ये 206 धावा केल्या. आरसीबीचा घरच्या मैदानातील अर्थात एम चिन्नास्वामी स्टेडियममधील हा 50 तर या मोसमातील एकूण पाचवा विजय ठरला. आरसीबी यासह या हंगामात राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्सनंतर 5 सामने जिंकणारी तिसरी टीम ठरली.