उन्हाळ्यातही चेहरा राहिल फ्रेश, घरच्या घरी बनवा रोझ फेस मिस्ट, जाणून घ्या बनवण्याची पद्धत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, May 9, 2026

उन्हाळ्यातही चेहरा राहिल फ्रेश, घरच्या घरी बनवा रोझ फेस मिस्ट, जाणून घ्या बनवण्याची पद्धत

उन्हाळ्यातही चेहरा राहिल फ्रेश, घरच्या घरी बनवा रोझ फेस मिस्ट, जाणून घ्या बनवण्याची पद्धत

दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढत चालेला आहे. वाढत्या उष्णतेमुळे शरीरासोबतच अनेकांना त्वचेच्या अनेक समस्या वाढू लागलेत. घाम , धूळ आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे तुमचा चेहरा लवकरच निस्तेज आणि थकलेला दिसू लागतो. जर तुम्हाला या कडक उन्हात देखील दिवसभर फ्रेश आणि चमकदार त्वचा हवी असेल, तर गुलाबापासून बनवलेला फेस मिस्ट हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. तर हा फेस मिस्ट केवळ त्वचेला थंडावाच देत नाही, तर त्वचेतील ओलावाही टिकवून ठेवतो. चला तर मग गुलाबापासून तयार फेस्ट मिस्ट घरच्या घरी या सोप्या पद्धतीने बनवा.

रोझ फेस मिस्ट खास का आहे?

गुलाबामध्ये नैसर्गिक शीतलता देणारे आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. रोझ फेस मिस्ट त्वचेला आराम देते आणि दाह कमी करण्यास मदत करते. विशेषतः उन्हाळ्यात जेव्हा त्वचा वारंवार कोरडी होते तेव्हा हे फेस मिस्ट चेहऱ्याला त्वरित आर्द्रता देऊन ताजेतवाने करते. नियमित वापरामुळे त्वचा मऊ आणि निरोगी राहण्यास मदत होते.

घरीच फेस मिस्ट कसा बनवायचा?

गुलाबाचा फेस मिस्ट बनवणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला ताज्या गुलाबाच्या पाकळ्या लागतील. त्या स्वच्छ पाण्यात धुवा आणि नंतर कोमट पाण्यात उकळा.

पाणी थंड झाल्यावर ते गाळून घ्या आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. इच्छित असल्यास तुम्ही या मिस्टमध्ये ग्लिसरीन किंवा कोरफड जेलचे काही थेंब टाकू शकता, ज्यामुळे ते अधिक मॉइश्चरायझिंग होईल.

गुलाब फेस मिस्टचा वापर कसा करायचा?

तुम्ही हा फेस मिस्ट दिवसातून 2 ते 3 वेळा चेहऱ्यावर स्प्रे करू शकता. कामावरून घरी आल्यावर किंवा जेव्हा तुमचा चेहरा थकलेला वाटेल तेव्हा याचा वापर करा. फ्रेश लूकसाठी मेकअपवरही याचा हलका स्प्रे करता येतो. झोपण्यापूर्वी याचा वापर केल्याने तुमच्या त्वचेला आरामही मिळू शकतो.

कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?

फेस मिस्टचा थंडपणा टिकवून ठेवण्यासाठी तो नेहमी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. तुमची त्वचा संवेदनशील असल्यास आधी पॅच टेस्ट नक्की करा. तसेच त्याचा ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी 4-5 दिवसांच्या आत त्याचा वापर करा.

उन्हाळ्यात तुमची त्वचा ताजीतवानी आणि चमकदार ठेवण्यासाठी रोझ फेस मिस्ट हा एक सोपा स्वस्त आणि नैसर्गिक उपाय आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)