
गेल्या काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. कधी उष्णता तर कधी पाऊस अशी स्थिती आहे. गेल्या आठ दिवसांपासून राज्यात सुर्य आग ओकताना दिसत आहे. स्थिती गंभीर होती. राज्यातील जवळपास जिल्ह्यांमध्ये तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले. तब्बल 46 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमानाची नोंद झाली. आता पुन्हा एकदा उष्णता आणि पाऊस असे समीकरण बघायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा जारी केला. विदर्भासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने मराठवाडा आणि विदर्भात जारी केला. वाशिम जिल्ह्यात राज्यातील सर्वात जास्त तापमानाची नोंद झाली. वाशिममध्ये उच्चांकी 42.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरी या भागाच उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला.
बाकी मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला. ज्या भागात उष्णतेचा अलर्ट हवामान विभागाने जारी केला अशा भागातील नागरिकांनी अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, दुपारी 12 ते 4 यादरम्यान. सिंधुदुर्गामध्ये पावसाने गेले दोन दिवसापासून थैमान मांडलेलं पाहायला मिळते. खारेपाटण या परिसरामध्ये विजांच्या कडकडासह ,वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.
तळकोकणात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी. जिल्ह्यातील काही भागात वादळी वारा व विज्यांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला . दुपारच्या सत्रात कडक उन्ह आणि सायंकाळी पाऊस. मागील तीन दिवस जिल्ह्यात उन पावसाचा खेळ. जोरदार विजांच्या कडकडाटामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात वीज गायब. वादळी पावसामुळे अनेक भागात मोठे नुकसान झाले.
भंडारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. लाखनी तालुक्यातील जेवणाला परिसरात विक्रीसाठी तयार ठेवलेला मका पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे भिजण्याच्या संकटात सापडला. वाऱ्याच्या तडाख्याने मका झाकण्यासाठी टाकलेल्या त्रिपाल (ताडपत्री) उडून गेल्याने शेतकरी भर पावसात जीवाची बाजी लावत मका वाचवण्यासाठी धावपळ करताना दिसले. कष्टाने पिकवलेले पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची सुरू असलेली धडपड या घटनेतून समोर आली आहे.