
मुंबईसह राज्यात 15 जूनपासून मॉन्सूनच्या पावसाला सुरूवात होईल, असा अंदाज आहे. मात्र, यादरम्यानच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाला. एल निनोमुळे थेट मॉन्सूनच्या पावसावर परिणाम होऊ शकतो. विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी केला. जून महिन्याच्या 14 तारखेला थेट उष्णतेचा इशारा दिला जात आहे. राज्यातील पेरण्या रखडल्या आहेत. मॉन्सूनचा दूरपर्यंत काही पत्ता नाही. त्यामध्येच एल निनोचा प्रभाव मॉन्सूनवर दिसत आहे. जगातील अनेक हवामान संस्था गंभीर इशारा देत आहेत. उद्यापासून संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस मॉन्सूनचा बरसण्याची शक्यता आहे. मॉन्सून बंगालसह बिहारच्या काही भागात प्रगती करत आहे. ओडिसासह झारखंडच्या भागात मॉन्सूनने हजेरी लावली. मात्र, अरबी समुद्रात मॉन्सून काही पुढे सरकताना दिसत नाही. मॉन्सूनच्या पुढील वाटचालीकरिता वाट पाहवी लागणार आहे. मॉन्सूनच्या वाटचालीकरिता अडथळा येत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा मोठा इशार देण्यात आला.
अरबी समुद्रातील मॉन्सूनची वाटचाल बघता राज्याला मॉन्सूनच्या पावसासाठी अजून काही दिवस वाट पाहवी लागणार आहे. शिवाय यंदा राज्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याचा अंदाज आहे. मॉन्सूनचा पाऊस पुढे वाटचाल करत नसल्याने मोठे संकट उभे आहे. राज्यात पेरण्या रखडल्या असून शेतकरी राजा चिंतेत आहे.
जुनचा दुसरा आठवडा संपत आला आहे. पण अजूनही आभाळाने दार उघडलेलं नाही. पावसाचा एकही थेंब जमिनीवर पडलेला नाही. इकडे शेतकऱ्याने मात्र आशेच्या भरवशावर शेत तयार करून ठेवले आहेत. मशागत पूर्ण केली, खत-बियाणे घरात आणून ठेवले, पण आभाळाकडे पाहणारे त्याचे डोळे अजूनही प्रतीक्षेतच आहे. कारण बळीराजासाठी पाऊस म्हणजे केवळ पाणी नाही… तर त्याच्या संसाराचा श्वास आहे.
याच पावसावर लेकरांच्या शिक्षणाची स्वप्नं अवलंबून आहेत. मुला-मुलींच्या लग्नाची जबाबदारी अवलंबून आहे. घरखर्च, दवाखाना आणि वर्षभराच्या उदरनिर्वाहाची आशा अवलंबून आहे. त्यामध्येच कृषी विभागाने जोपर्यंत आवाहन केले जाणार नाही, तोपर्यंत पेरण्या करू नये, असे आवाहन केले आहे. ज्यामुळे दुबार पेरणीचे संकट राहणार नाही.