आजही राज्यात पाऊस, शेतकऱ्यांना प्रशासनाकडून महत्वाची सूचना, येलो अलर्ट जारी.. - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, June 9, 2026

आजही राज्यात पाऊस, शेतकऱ्यांना प्रशासनाकडून महत्वाची सूचना, येलो अलर्ट जारी..

आजही राज्यात पाऊस, शेतकऱ्यांना प्रशासनाकडून महत्वाची सूचना, येलो अलर्ट जारी..

15 जूनपर्यंत राज्यात मॉन्सूनचा पाऊस होण्याची कमी शक्यता असल्याचे प्रशासनाने म्हटले. आता मॉन्सून पुढे सरकताना दिसत आहे. शेतकऱ्यांनी पेरणीकरिता गडबड करून नये, असेही सांगण्यात आले. यावेळी दोन दिवस केरळमध्ये उशिराने मॉन्सून दाखल झाला. मात्र, आता तो अधिक रेगाळताना दिसतोय. दक्षिण कोकणासह राज्यात काही भागात मॉन्सूनने जोरदार हजेरी लावली. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी जोरदार आज पाऊस होईल. राज्यात पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला. राजापूर, वैभववाडी, रामेश्वर, चिपळून,सांगली, मिरज, शिराळा, हातकणंगले, जेरूर, कळंम, लातूर, पूर्णा, धारूर, अहमदपूर या भागात पावसाने हजेरी लावली. आजही काही भागात पावसाचा अंदाज आहे. प्रशासनाकडून शेतकरी आणि नागरिक यांच्याकरिता काही सूचना मॉन्सूनच्या पार्श्वभूमीवर देण्यात आल्यात.

पुण्याच्या भोर तालुक्यातील ग्रामीण भागात पावसा अभावी खरीप पिकांच्या पेरण्या रखडल्या आहेत. बळीराजाला पावसाची प्रतीक्षा करतोय. बळीराजाने खरिपातील पिकांच्या पेरणीसाठी शेती सज्ज करून ठेवली आहे. मात्र, पाऊस नसल्याने खरीप पिकांच्या पेरण्या रखडल्यात. सद्यःस्थितीला शेतकऱ्यांची शेतीकामे उरकली असून बहुतांशी शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी बी-बियाणे खरेदी करून ठेवलेत.

प्रशासनानेही 15 तारखे पर्यंत पावसाची शक्यता कमी असल्याने.. तोपर्यंत पेरणी करू नये असं आवाहन शेतकऱ्यांना केलेलं आहे. पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं आवाहन करत असताना नांदेड जिल्ह्यात मात्र धूळ पेरणीला काही शेतकऱ्यांनी सुरुवात केलीय. यामुळे दुबार पेरणीचं संकट उडवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हिंगोली जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस वादळी वाऱ्यासह झाला.

मृग नक्षत्राच्या दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाल्याने हळद लावगड केलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. राज्यात अनेक भागात पाऊस हजेरी लावत आहे. पाऊस हजेरी लावत असतानाच पाऊस कमी असल्याने शेतकऱ्यांनी आताच पेरण्या करू नयेत, असे आवाहन करण्यात आले. मात्र, प्रशासनाच्या आवाहनानंतरही काही शेतकऱ्यांकडून पेरणी केली जात आहे. ज्यामुळे दुबार पेरणीचे संकट उभे आहे. देशातील अनेक राज्यात जोरदार पाऊस पडत आहे.