दक्षिणेकडेच्या सिनेमांमध्ये आजही हिरॉईन्सना भूमिका, अभिनय यापेक्षा त्यांचं सौंदर्य आणि शारीरिक आकर्षणाच्या दृष्टीकोनाने सादर केलं जातं. जान्हवीने आता बचावासाठी सर्व खापर डायरेक्टर बुची बाब सनवर फोडलं आहे. म्हटलं की मला याचा अंदाज नव्हता.
चित्रपटात माझं कॅरेक्टर अशा पद्धतीने सादर केलं जाईल याची मला कल्पना नव्हती असं जान्हवी कपूरने म्हटलं आहे. पण या सर्व वादा दरम्यान तापसी पन्नूचं एक जुनं स्टेटमेंट पुन्हा चर्चेत आलं आहे. त्यात ती साऊथ फिल्म इंडस्ट्रीत हिरॉईन्सना सादर करण्याच्या पद्धतीवर मोकळेपणाने बोलली होती.
तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी तिने तामिळ, तेलगु, चित्रपटात बरचं काम केलं आहे. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत ती अनेक मोठ्या चित्रपटांचा भाग होती. एका पॉडकास्टमध्ये ती बोलली होती की, साऊथच्या चित्रपटात अनेकदा हिरॉइनचा लूक आणि शरीरावर गरजेपेक्षा जास्त लक्ष दिलं जातं.
कॅमेऱ्यासमोर हिरॉइनचा लूक जास्त आकर्षक दिसावा म्हणून अनेकदा अभिनेत्रींना पॅडेड ब्रा घालायला सांगितला जातो असं तापसी त्यावेळी म्हणालेली. अशा गोष्टी थेट सांगितल्या जात नाहीत. सहाय्यक दिग्दर्शक आणि स्टायलिंग टीममार्फत अभिनेत्रीपर्यंत हा संदेश पोहोचवला जातो.
शूटिंगच्यावेळी अशा मागण्यांमुळे अनेकदा असहजता आणि लाज वाटते. मेकर्सचं कॅमेऱ्यावर समाधान झालं नाही, तर अभिनेत्रीला पुन्हा बदल करायला सांगितला जातो असं तापसी म्हणालेली.




