Ketan Agarwal Murder : केतनला संपवणाऱ्या सिया गोयल हिला मोठा धक्का, जवळच्या लोकांनीच…. चक्रावणारी अपडेट समोर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, June 26, 2026

Ketan Agarwal Murder : केतनला संपवणाऱ्या सिया गोयल हिला मोठा धक्का, जवळच्या लोकांनीच…. चक्रावणारी अपडेट समोर

Ketan Agarwal Murder : केतनला संपवणाऱ्या सिया गोयल हिला मोठा धक्का, जवळच्या लोकांनीच…. चक्रावणारी अपडेट समोर

पुण्यातील प्रसिद्ध बिझनेसमन विशाल अग्रवाल यांचा तरुण मुलगा केतन अग्रवाल याचा लोहगडावरून पडून मृत्यू झाला. आधी अपघात वाटणाऱ्या या केसमध्ये नंतर मोठा ट्विस्ट आला. केतनची होणारी पत्नी सिया हिनेच तिच्या मित्रासह मिळून केतनला संपवण्याचा प्लान आखला आणि 18 जूनला त्याला लोहगडावरून धक्का दिला. शेकडो फूट खोल दरीत कोसळल्यामुळे केतनचा जीव गेला. या घटनेने फक्त पुणे, अथवा राज्यालाच नव्हे तर अख्खा देशाला हादरवलं आहे. सध्या सिया गोयल आणि तचा प्रियकर चेतन चौधरी अटकेत असून त्यांना 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. सियाच्या अटकेनंतर घरच्यांना मोठा धक्का बसला असून तिचे वडील, प्रवीण गोयल हे सध्या रुग्णालयात दाखल आहेत. याच दरम्यान सियाला आता मोठा धक्का बसला आहे, कारण तिच्या जवळच्या लोकांनीच या केसमध्ये मोठी मागणी केली आहे.

केतनच्या मृत्यूनंतर सियाच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ते केतनबद्दल भरभरून बोलले, त्याचं खूप कौतुकही केलं आणि या कोसमधील दोषींना सोडू नका, त्यांना कठोर शिक्षा करा अशी मागणी त्यांनी केली.

काय म्हणाले प्रवीण गोयल ?

हॉस्पिटलमध्ये असूनही सियाच्या वडिलांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “ही अत्यंत दुःखद घटना आहे. केतन गेलाय, यावर विश्वास ठेवणं अजूनही मला कठीण जात आहे. अग्रवाल कुटुंबाने आपला मुलगा गमावला, पण केतनवर त्यांचं जेवढं प्रेम होते, त्याहून अधिक प्रेम मी त्याच्यावर करत होतो. माझा त्याच्याशी इतका जिव्हाळा निर्माण झाला होता की, मी त्याला माझ्या स्वतःच्या मुलासारखेच मानू लागलो होतो. अशा एका उत्तम मुलाला गमावल्यामुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे.” असं म्हणत गोयल यांनी शोक व्यक्त केला.

माझी मुलगी दोषी असेल तर

या केसमध्ये सियाला अटक केल्यावर, तिचं नाव समोर आल्यावर त्यांना मोठा धक्का बसला आहे. ” या दुर्दैवी घटनेबाबत एकमेव दिलासा तेव्हाच मिळेल, जेव्हा दोषीला शक्य तितकी कठोर शिक्षा होईल. ज्याप्रमाणे आमचा केतन त्या किल्ल्यावरून खाली पडला, त्याचप्रमाणे या हत्येसाठी जो कोणी दोषी असेल, मग ती माझी स्वतःची मुलगी का असेना, ती दोषी असेल तर तिलाही त्याच ठिकाणावरून खाली ढकलून दिले पाहिजे.” अशी मागणी त्यांनी केली.

 

लग्न ठरल्यावर सिया खुश होती

” अग्रवाल कुटुंबावर जे मोठं संकट ओढवलं आहे; यापेक्षा अधिक दुःखद घटना दुसरी असूच शकत नाही, असं एक वडील म्हणून मी सांगेन,” असं ते म्हणाले. ” केतन सियाच्या लग्नाबाबत आमच्या खूप अपेक्षा होत्या. हे नातं जुळल्यापासून सिया खूप आनंदी होती. ती म्हणायची, ‘केतन खूप छान आहे; मला खूप चांगलं सासर आणि नणंद मिळाली आहे. मी खूप आनंदी आहे ” असा दावा सियाच्या वडिलांनी केला. सियाबाबत काही गोष्टी लपवून ठेवल्या असा आरोप केतनच्या वडिलांनी केला होता, त्यावरही सियाचे वडील स्पष्ट बोलले – काही गोष्टी माहिती असत्या, तर आम्ही ते सांगितसं असतं, तर कदाचित आचा दिवस पहावा लागला नसता.

सिया- चेतनच्या प्रेमसंबंधांबद्दल काय म्हणाले वडील ?

चेतनसोबतच्या आपल्या मुलीच्या संबंधांबद्दल बोलताना सियाचे वडील प्रवीण गोयल म्हणाले, “आम्हाला याबद्दल काहीच कल्पना नव्हती. सिया ही 19 वर्षांची एक साधी-भोळी मुलगी आहे; 19 वर्षांची मुलगी खरोखरच असं काही करू शकते का? चेतन कुठून आला होता, याची मला काहीच कल्पना नाही; मी त्याचा चेहरा कधी पाहिला नव्हता किंवा त्याच्याशी कधी बोललोही नव्हतो. आम्ही त्याचं नावही यापूर्वी कधी ऐकलं नव्हतं.” असा दावा गोयल यांनी केला.