फोनमधील Virtual RAM ही टेक्नॉलॉजीचं काम काय? जाणून घ्या त्याचे 3 फायदे - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, June 28, 2026

फोनमधील Virtual RAM ही टेक्नॉलॉजीचं काम काय? जाणून घ्या त्याचे 3 फायदे

फोनमधील Virtual RAM ही टेक्नॉलॉजीचं काम काय? जाणून घ्या त्याचे 3 फायदे

भारतीय बाजारात रोज अनेक मोबाईल कंपन्या त्यांचे स्मार्टफोन लाँच करत असतात. त्यातच वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेऊन नवीन फोन बाजारपेठेत सादर होत असतात. अशातच लाँच होणाऱ्या बहुतेक नवीन फोन्समध्ये तुम्हाला व्हर्च्युअल रॅम हे फीचर पाहायला मिळते. कंपन्या लाँचच्या वेळी या फीचरवर विशेष लक्ष देतात, जेणेकरून ग्राहकांना कळेल की नवीन फोन व्हर्च्युअल रॅम फीचरसह येतो. याला डायनॅमिक रॅम असेही म्हणतात. तर अनेकांना असा प्रश्न पडतो की हे व्हर्च्युअल रॅम म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहेत? कंपन्या व्हर्च्युअल रॅमसाठी फोनमध्ये वेगळी फिजिकल चिप बसवत नाहीत; उलट हे एक सॉफ्टवेअर-आधारित टेक्नॉलॉजी आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण व्हर्च्युअल रॅम म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊयात.

फोनच्या रिटेल बॉक्सवर असे नमूद केलेले असते की फोन हा 8GB व्हर्च्युअल रॅमसह किंवा 12GB व्हर्च्युअल रॅमसह येतो. आता याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, जर तुम्ही 8GB व्हर्च्युअल रॅम असलेला 8GB फोन विकत घेतला , तर जेव्हा तुम्ही हे फीचर वापराल, तेव्हा फोन तुमच्या फोनमधील मोकळी स्टोरेज जागा वापरेल आणि त्या बदल्यात तुम्हाला अतिरिक्त रॅम देईल.

व्हर्च्युअल रॅम कसे काम करते?

हे फीचर आता बजेट स्मार्टफोन्सपासून ते फ्लॅगशिप स्मार्टफोन्सपर्यंत सर्व प्रकारच्या फोन्सवर उपलब्ध आहे. येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, जर तुमच्या फोनमध्ये पुरेशी मोकळी जागा नसेल, तर हे फीचर तुमच्यासाठी कदाचित काम करणार नाही, कारण यासाठी मोकळ्या स्टोरेज स्पेसची आवश्यकता असते.

व्हर्च्युअल रॅमचे फायदे

व्हर्च्युअल रॅम वापरून रॅम वाढवण्याचा पहिला फायदा म्हणजे मल्टीटास्किंग सुधारते.

दुसरा फायदा म्हणजे अतिरिक्त रॅममुळे ॲप्स अधिक वेगाने लोड होऊ शकतात.

तिसरा फायदा म्हणजे जेव्हा रॅम कमी असते, तेव्हा ॲप्स अनेकदा क्रॅश होतात आणि अनपेक्षितपणे बंद होतात. अधिक रॅम घेतल्याने ॲप क्रॅश होणे देखील टाळता येऊ शकते.