Rain Alert : राज्यात हाहाकार! या जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर, घराबाहेर पडणे टाळा, पुढील 8 तास.. - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, July 2, 2026

Rain Alert : राज्यात हाहाकार! या जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर, घराबाहेर पडणे टाळा, पुढील 8 तास..

Rain Alert : राज्यात हाहाकार! या जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर, घराबाहेर पडणे टाळा, पुढील 8 तास..

Rain Alert Maharashtra : राज्यात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. सर्वदूर पाऊस कोसळत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई, ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. मुंबई, ठाणे आणि रायगडला भारतीय हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला. हिंदमाता परिसरात पाणी भरण्यास सुरूवात झाली. हवामान विभागाकडून सर्तक राहण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे. शक्यतो अतिमहत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळाच. पावसाचे धुमशान बघायला मिळतंय. कालपासून मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक रस्ते जलमय झालीत. पुढील काही वेळात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पालघर, पुणे आणि घाटमाथ्यावर तर आज रेड अलर्ट जारी करण्यात आला.

पुढील 8 तासात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासना अलर्ट मोडवर आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून यलो अलर्ट कायम आहे. हवामान खात्याने 2 जुलैपासून शहरासह जिल्ह्याला यलो अलर्ट जारी केला. घाटमाथा व आजूबाजूच्या परिसराकरिता ऑरेंज अलर्ट जारी केला.

पश्चिम भागातील ईगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 4 जुलैपासून जिल्ह्यात दमदार पावसाची वर्तवली जात आहे. नवी मुंबईत पावसाला सुरवात झाली. जुईनगर, बेलापूर, पनवेल परिसरात पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्यानंतर मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस सुरु होता. पुढचे काही दिवस असच मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. पावसामुळे धावत्या मुंबईचा मंदावलेला वेग कधी पूर्ववत होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यामध्येच रायगड आणि पालघर जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. दोन्ही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली. रायगडमधील 7 तालुक्यातील शाळांना ही सुट्टी जाहीर करण्यात आली. रात्रीपासून अनेक जिल्ह्यात पाऊस सुरू आहे.

कल्याण-डोंबिवलीत पावसाची संततधार कायम. मध्यरात्रीनंतर दिलासा, तरीही रिमझिम सुरूच.  गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने कल्याण-डोंबिवलीत जनजीवन विस्कळीत केले. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग आणि रस्त्यांवर पाणी साचले होते. मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने साचलेल्या पाण्याचा निचरा झाला. मात्र, आजही शहरात ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस सुरूच आहे. चेंबूर मधील सुभाषनगर परिसरात सखल भागात पाणी साचण्यास सुरवात झाली आहे. काल रात्रभर मुसळधार पाऊस बरसत असल्यामुळे मुंबई उपनगर मधील सखल भागात पाणी साचण्यास सुरवात झाली आहे.