नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, August 28, 2026

नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू

नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तत्परतेनं पर्यटकांचा परतीचा प्रवास सुरू झालाय. नागपूरचे सर्व प्रवासी काठमांडूहून दानापूरसाठी निघालेत. नेपाळचे खासदार संदीप राणा यांनी त्यांना स्थानिक चार मिनी बस करून दिल्यात. आमची मोठी बस पुढे जाऊ शकत नसल्याचे समजताच देवाभाऊंनी तात्काळ चार मिनी बसची व्यवस्था करून दिली. तसेच आम्ही जिथे अडकलो होतो, तिथे स्थानिक प्रशासनाशी स्वतः फोन करून संपर्क करून त्वरित बसची व्यवस्था केली आणि आम्हाला सुरक्षितपणे पुढील प्रवासांना रवाना केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतामध्ये परत येईपर्यंत देवाभाऊंची आमच्याशी सतत संपर्क असून आमच्या प्रवासासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था ते करून देत आहेत. अशा कठीण प्रसंगी स्वतः लक्ष देऊन मदतीचा हात दिल्याबद्दल देवाभाऊंचा खूप मनःपूर्वक धन्यवाद.