एका आठवड्यात जर निर्णय घेतला नाही… तर, आम्ही संभाजीनगरातच… अभिजीत दीपके काय म्हणाले ? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, August 17, 2026

एका आठवड्यात जर निर्णय घेतला नाही… तर, आम्ही संभाजीनगरातच… अभिजीत दीपके काय म्हणाले ?

एका आठवड्यात जर निर्णय घेतला नाही… तर, आम्ही संभाजीनगरातच… अभिजीत दीपके काय म्हणाले ?

हायकोर्टाच्या लिपिक परीक्षेतील गडबडीमुळे विद्यार्थ्यांनी संभाजीनगरासह राज्याच्या विविध भागात आंदोलन केले.त्यानंतर रात्री हायकोर्टाने या प्रकरणात नोटीस जारी केली होती. या आंदोलनाला अभिजीत दिपके यांनी स्वत: आंदोलनात उतरुन पाठींबा जाहीर केला होता. त्यानंतर आता रात्री उशीरा या प्रकरणात अभिजीत दिपके यांनी सरकारला इशारा दिला आहे. जर एका आठवड्यात विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर जर निर्णय घेतला नाही तर, तर आम्ही संभाजीनगरातच आंदोलनाला बसू असा इशारा अभिजीत दिपके यांनी दिला आहे.

आज जी गडबड झाली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.केवळ संभाजीनगरातच नाही तर राज्यात नांदेड, नाशिक, कल्याण अशा अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन झाला होता. या आंदोलनाची दखल कोर्टाने घेतलीय, सगळ्या स्टुडन्सने ठरवले आहे की रि- एक्झामवर एका आठवड्यात जर निर्णय झाला नाही. गडबड झालेल्या परीक्षा सेंटरना ब्लॅक लीस्ट केले नाही आणि सर्व्हर डाऊन प्रकरणात कंपनीचे टेंडर रद्द केले नाही तर आम्ही पुन्हा आंदोलन करु आणि ते आंदोलन संभाजीनगरातच होईल असेही अभिजीत दीपके यांनी म्हटले आहे.

कोणाचा कीबोर्ड चालत नाही कोणाचा माउस चालत नाही, कोणाची स्क्रीन चालत नाही. विद्यार्थ्यांनी जेव्हा यावर आक्षेप घेतला तेव्हा इथल्या मॅनेजमेंट स्टाफ यांना म्हणतो की तुमची ऑनलाईन परीक्षा देण्याची लायकी आहे का ?  मी म्हणतो की यांची लायकी आहे का परीक्षा घेण्याची ? हे स्टुडन्टची लायकी काय  काढतात ? असेही या आंदोलनाच्या वेळी अभिजीत दीपके प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

यांच्याकडे चांगले कीबोर्ड नाहीत चांगले कॅम्पुटर नाहीत. तुमची स्वतःची लायकी नाही आणि स्टुडन्टची लायकी का म्हणून काढताय असेही दीपके यावेळी म्हणाले.  सर्व ठिकाणी हाच गोंंधळ होता.  कल्याणमध्ये झालंय, नाशिक मध्ये झालं नांदेड मध्ये झाले. परीक्षा पूर्ण न होता काही विद्यार्थ्यांना नापास करण्यात आल आहे.  हे सिस्टीमचे अपयश आहे, त्यामुळे सिस्टमला कुठे ना कुठे जबाबदारी घ्यावी लागेल असेही दीपके यावेळी म्हणाले.