तो मफलरमॅन कोण? अजितदादांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांचा खळबळजनक दावा; रोख कुणाकडे? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 1, 2026

तो मफलरमॅन कोण? अजितदादांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांचा खळबळजनक दावा; रोख कुणाकडे?

तो मफलरमॅन कोण? अजितदादांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांचा खळबळजनक दावा; रोख कुणाकडे?

खेमचंद कुमावत, टीव्ही ९ मराठी, प्रतिनिधी :  राज्याचे नेते अजितदादा पवार याचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर वीएसआरला विमान कंपनीबद्दल त्यांचे पुतणे रोहित पवार यांनी संशय व्यक्त केला होता. या विमान कंपनी कशी नियमबाह्य सेवा पुरवते असते याचे पुरावे रोहित पवार यांनी एका पत्रकार परिषदेत दिले होते. आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना याविषयी पुन्हा नवे वक्तव्य केले आहे.

अजितदादा पवार यांच्या अपघाता प्रकरणात आमचा ज्या कंपनीवर संयश आहे. त्या कंपनीला वाचवण्यात एका मफलर मॅनचा हात आहे. त्या मफलर मॅनचे नाव आपण १० ऑक्टोबरच्या पत्रकार परिषदेत जाहीर करणार आहोत असे रोहित पवार यांनी यावेळी म्हटले आहे.

चाळीसगावातील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, एका कुठल्यातरी कार्यक्रमामध्ये त्या नेत्याने असा मफलर घातला होता. आतापर्यंत या नेत्यानेच वीएसआर कंपनीला वाचवले आहे. अजितदादांचा एक्सीडंट वा घातपात ज्या लोकांनी केला असावा असे आम्हाला वाटतं. अशा लोकांना जर कुणी वाचवत असेल तर त्यांचे नाव सुद्धा आम्ही लपवणार नाही ते नाव सुद्धा येत्या १० तारखेला सकाळी १० ते ११ वाजताच्या दरम्यान आम्ही जाहीर केल्या शिवाय राहणार नाही असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. हा नेता केंद्रातला की राज्यातला असे पत्रकारांनी विचारले असता त्यांनी केंद्रातला नाही राज्यातलाच आहे. त्याचे नाव आणि पुराव्यासकट आम्ही येत्या १० तारखेला सांगू असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

येथे व्हिडीओ पाहा –