Nagpur Graduate MLC: मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात अभिजीत वंजारी आणि सुधाकर कोहळे यांच्यात काँटे की टक्कर, कराळे मास्तरांची टशन, कोण धक्का देणार? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 28, 2026

Nagpur Graduate MLC: मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात अभिजीत वंजारी आणि सुधाकर कोहळे यांच्यात काँटे की टक्कर, कराळे मास्तरांची टशन, कोण धक्का देणार?

Nagpur Graduate MLC: मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात अभिजीत वंजारी आणि सुधाकर कोहळे यांच्यात काँटे की टक्कर, कराळे मास्तरांची टशन, कोण धक्का देणार?

Nagpur Graduate MLC Election 2026: राज्यातील विधान परिषदेच्या विधान परिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघात कल फिरले आणि वारंही फिरलं आहे. छत्रपती संभाजीनगर मराठवाडा पदवीधर ते पुण्यातही महाविकास आघाडी धक्का देण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर पदवीधरमध्येही काँग्रेस-महाविकास आघाडीने टशन दाखवली आहे. येथे काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी आणि भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्यात काँटे की टक्कर दिसून आली. रात्री उशीरापर्यंत सुरू असलेल्या मतमोजणीत आघाडी आणि पिछाडी असा उन्हसावल्याचा खेळ सुरूच होता.

दुसऱ्या फेरीत कोहळे आघाडीवर, वंजारी यांची टशन

मतमोजणी नंतर 1 लाख 50 हजार 874 मत हे वैध ठरली आहे. त्यानुसार कोटा 75 हजार 438 मताचा कोटा ठरला असतांना दोन्ही उमेदवार हे मत घेऊ शकले नाही, त्यामुळे दुसर्‍या पसंती क्रमाचे मत मोजणी सुरू झाली. अवैध ठरलेल्या मतांची रिकाउंटिंग करण्याची मागणी भाजप चे उमेदवार सुधाकर कोहळे यांनी केली . भाजपचे सुधाकर कोहळे यांना दुसर्‍या फेरीत दोन ते अडीच हजार मतांची आघाडी मिळण्याचा अंदाज वर्तवला जात होता. मात्र एलिमीनेशनमध्ये काँग्रेसचे अभिजित वंजारी समोर जाणार का ? या कडे लक्ष लागले होते. दुसऱ्या फेरीत सुधाकर कोहळे यांनी आघाडी घेतली.

नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक

दुसऱ्या फेरी अंती मिळालेले मत

अभिजीत वंजारी 56651

सुधाकर कोहळे -60935

नितेश कराडे -23985

दुसऱ्या फेरी अखेरीस 4284 मतांनी भाजप चे सुधाकर कोहळे आघाडीवर

अवैध मत – 15106

एकमेकांविरोधात घोषणाबाजी तर दुसरीकडे गळाभेट

नागपूर पदवीधर मतदार संघाची मतमोजणी सुरू असताना भाजप आमदार आणि काँग्रेस उमेदवारांची गळाभेट झाली. हे चित्र पाहून अनेकांनी आनंद व्यक्त केला. काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी मतमोजणी केंद्रावर पोहचले असता भाजप आमदार प्रवीण दटके यांनी त्यांना आवाज दिला आणि दोघांनी गळाभेट घेतली .यावेळी भाजप आणि काँग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते.

तर दुसरीकडे नागपुरातील मानकापूर स्टेडियम मतमोजनी केंद्राच्या बाहेरील मुख्य रोड वर काही भाजपचे आणि काही काँग्रेस चे कार्यकर्ते जमले होतेय दोन्ही बाजूने घोषणाबाजी करण्यात आली. येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. नंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी तिथून हटविले.