Petrol-Diesel Price: ट्रम्प यांच्यामुळे अच्छे दिन, पेट्रोल-डिझेलमध्ये स्वस्ताई? आजचा 1 लिटरचा भाव किती? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 3, 2026

Petrol-Diesel Price: ट्रम्प यांच्यामुळे अच्छे दिन, पेट्रोल-डिझेलमध्ये स्वस्ताई? आजचा 1 लिटरचा भाव किती?

Petrol-Diesel Price: ट्रम्प यांच्यामुळे अच्छे दिन, पेट्रोल-डिझेलमध्ये स्वस्ताई? आजचा 1 लिटरचा भाव किती?

पेट्रोल आणि डिझेलचे लवकरच अच्छे दिन येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. लवकरच इंधनाचे दर घसरण्याचा अंदाज बांधल्या जात आहे. त्यामागे जागतिक घडामोड आहे. मध्य-पूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधन किंमतींना आळा घालण्यासाठी G7 देशांनी एकत्र येत मोठा धोरणात्मक निर्णय घेतला. या देशांनी त्यांच्या साठ्यातील 100 दशलक्ष, 10 कोटी बॅरल कच्चे तेल आणि डिझेल बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासाठी युरोपियन देशांवर दबाव वाढवला होता. अन्यथा अमेरिका या देशांना इंधन आणि डिझेल पुरवठ्यावर निर्बंध आणणार होता. यामुळे जागतिक बाजारात इंधनाचा पुरवठा वाढणार आहे. किंमतींवर त्याचा परिणाम होईल. ट्रम्प यांच्या या धोरणात्मक निर्णयामुळे पेट्रोल आणि डिझेलचे अच्छे दिन येतील का? हे येत्या काही दिवसात समोर येईल. कारण दुसरीकडे चीनही बाजारात मोठी चाल खेळत आहे. आज पेट्रोल आणि डिझेलची काय किंमत आहे ते जाणून घेऊयात.

कच्चा तेलाचा भाव काय?

जागतिक बेंचमार्क ब्रेंट क्रूड तेलाचा भाव अजून वाढला आहे. 97.90 डॉलर, 101 डॉलरवरून तो आज 102 डॉलर प्रति बॅरलवर पोहचला. तर अमेरिकेच्या WTI कच्चा तेलाचे दर 92 डॉलर प्रति बॅरलवरून अजून दोन डॉलरने वधारला.ओपेकचा कच्चा तेलाचा भाव जवळपास 111.80 डॉलर प्रति बॅरलपेक्षा अधिक आहे.

देशातील प्रमुख शहरातील आजचे इंधन दर काय?

goodreturns ने सरकारी तेल कंपन्यांच्या आधारे दिलेल्या आकडेवारीनुसार, देशातील प्रमुख महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या भावात मोठी तफावत आढळलेली नाही.

मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानीत पेट्रोलचा भाव 111.21 रुपये तर डिझेलची किंमत 97.83 रुपये इतकी आहे.

दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 102.12 रुपये तर डिझेलचा भाव 95.20 रुपये असा आहे.

चेन्नई: दक्षिणेतील मोठे शहर चेन्नईत पेट्रोलचा भाव 107.76 रुपये तर डिझेलची किंमत 99.55 रुपये अशी आहे

कोलकत्ता: पूर्वेतील या शहरात पेट्रोलची किंमत 113.51 रूपये तर डिझेलची किंमत 99.82 रुपये आहे.

कच्चे तेल घसरणीचा अर्थ समजून घ्या

जागतिक बाजारात अमेरिकाही मोठ्या प्रमाणात इंधन साठा उतरवत आहे. तर आता जी7 देशांचा इंधन साठाही बाजारात येईल. इराक, सौदी अरब या देशांनी पुरवठा वाढवला आहे. या कालावधीत भारतीय तेल विपणन कंपन्यांना स्वस्तात इंधन खरेदीची संधी मिळणार आहे. जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमती अशाच दबावाखाली राहिल्यास येत्या काळात देशातंर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवरही सकारात्मक परिणाम दिसू शकतो.

किंमती एका SMS वर

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.

इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.

बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.

त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.

त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.