सोलापूर: राज्याचे जलसंधारण मंत्री यांच्या गाडीनं एका तरुणाला उडवल्याचं वृत्त असून अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. संतप्त जमावानं गाडीची तोडफोड केल्याची माहिती देखील समोर येत आहे. बार्शी तालुक्यातील शेळगाव होळे येथे आज सकाळी ही घटना घडली. अपघात झाला तेव्हा तानाजी सावंत हे गाडीतच होते. मात्र, अपघातानंतर लगेचच त्यांनी दुसऱ्या एका गाडीनं घटनास्थळावरून काढता पाय घेतला. या घटनेमुळं लोकांमध्ये संताप असून सावंत यांच्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.