Live 'मन की बात': प्लास्टिकमुक्तीची शपथ घेऊ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, September 29, 2019

Live 'मन की बात': प्लास्टिकमुक्तीची शपथ घेऊ

https://ift.tt/2mNvPl9
आपल्या ''च्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधत आहेत. पंतप्रधानांनी मन की बातच्या सुरुवातीलाच नवरात्रोत्सव, छटपूजा, दसरा आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. जाणून घेऊयात पंतप्रधान मोदी काय म्हणताहेत... LIVE अपडेट्स... >> सरदार पटेल यांचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ३१ ऑक्टोबर रोजी आपण देशाच्या ऐक्यासाठी 'Run For Unity' चे आयोजन केलं आहे >> दिवाळीत फटाके फोडताना इतरांना त्याच्या त्रास होणार नाही, याची काळजी घ्या >> प्लास्टिकमुक्त भारताच्या अभियानात सामिल होण्याचे पंतप्रधानांचे देशवासीयांना आवाहन >> बापूंच्या १५० व्या जयंतीनिमित्त स्वच्छतेची प्रतिज्ञा घ्या...प्लास्टिकपासून स्वातंत्र्य मिळवण्याचे वचन द्या >> त्याच्या धैर्यानं जगभरातील लोकांची मनं जिंकली >>पीएम मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमात टेनिसपटू डेनिल मेदवेदेवचा उल्लेख केला >> 'भारत की लक्ष्मी' असा हॅशटॅग वापरून तुम्ही सोशल मीडियावर फोटो अपलोड करून त्यांचा सन्मान करू शकता >> आपण या लक्ष्मींचा सन्मान करण्यासाठी कार्यक्रमांचं आयोजन करू शकतो का याचा विचार करावा >> आपल्या कुटुंबात, समाजात अशा अनेक मुली असतील ज्या त्यांच्याकडे असलेल्या कौशल्याने देशाचं नाव उज्वल करतात. या दिवाळीत अशा लक्ष्मींचा सन्मान करूया >> आपण आपल्या गावात, खेड्यात, शहरांमध्ये मुलींचा सन्मान करण्यासाठी कार्यक्रमांचं आयोजन करू शकतो >> आपल्या संस्कृतीत मुलींना लक्ष्मी मानले जाते कारण मुली स्वत:सोबत समृद्धी घेऊन येतात >> आपण या माणसांच्या आयुष्यातील अंधार दूर केला पाहिजे...गरिबांसोबत, गरजूंसोबत आपण यंदा सण साजरे केले पाहिजे >> अशा परिस्थितीला 'दिव्याखाली अंधार' असं म्हणत असावेत >> आपल्या देशात उत्सव साजरे करण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतात, आनंद लुटतात...पण देशात अनेक असे लोक आहेत जे या आनंदापासून वंचित आहेत >> पंतप्रधान मोदींनी नवरात्रोत्सव, छटपूजा, दसरा आणि दिवाळीच्या दिल्या देशातील जनतेला शुभेच्छा >> गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा >> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मन की बात' सुरू...