सावरकरांचे देशासाठी मोठे योगदान: अभिषेक सिंघवी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 22, 2019

सावरकरांचे देशासाठी मोठे योगदान: अभिषेक सिंघवी

https://ift.tt/33PNiZT
नवी दिल्ली: यांना भारतरत्न देण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या मागणीनंतर वाद निर्माण झाला असताना, काँग्रेसचे नेते यांनी मात्र सावरकरांची प्रशंसा केली आहे. सावरकर यांनी केवळ भारतीय स्वातंत्र्य लढ्यातच आपले योगदान दिलेले नसून देशासाठी त्यांनी तुरुंगवासही भोगला आहे, असे सिंघवी यांनी म्हटले आहे. काँग्रेसने सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या मागणीला विरोध दर्शवला असताना सिंघवी यांनी हे वक्तव्य केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार असलेले अभिषेक मनु सिंघवी यांनी ट्विट करत आपले मत मांडले आहे. आपण व्यक्तीगतरित्या सावरकर यांच्या विचारधारेशी सहमत नाही आहोत. मात्र, त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले हे सत्य आपण नाकारू शकणार नाही. इतकेच नाही तर त्यांनी दलितांच्या हक्कासाठीही लढा देण्याचे काम केले. तसेच, देशासाठी ते तुरुंगातही गेले आहेत, असे सिंघवी म्हणाले. सिंघवी यांनी हे मत व्यक्त करण्यापूर्वी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनीही सावरकरांची प्रशंसा केली होती. गेल्याच आठवड्यात मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत माजी पंतप्रधान सिंह यांनी आपले मत मांडले होते. आम्ही सावरकर यांच्या विरोधात नसून, आम्ही त्या हिंदुत्वाच्या विचारधारेच्या विरोधात आहोत, ज्या विचारधारेच्या बाजूने सावकर उभे होते, असे सिंह म्हणाले. इंदिरा गांधी या पंतप्रधान असताना त्यांनी सावरकरांवर पोस्टाचे तिकीटही काढले होते, याची आठवणही डॉ. सिंह यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली होती. महाराष्ट्र भाजपने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात सावरकरांसह समाजसुधारक जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची मागणी करणार असल्याचे म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाच्या या मागणीवर काँग्रेससह इतर पक्षांनी टीकेची झोड उठवली होती. राष्ट्रपिता महात्मा गांधी याच्या हत्येप्रकरणी सावरकर यांच्या विरोधातही खटला चालला होता. पुढे ते यातून मुक्त झाले हा भाग निराळा, असे काँग्रेसने म्हटले होते. सिंघवी यांनी घेतला यूटर्न सिंघवी यांनी मांडलेल्या या मतामुळे पक्षात अस्वस्थता पसरली आहे. सिंघवी असे काही वक्तव्य करतील अशी काँग्रेसला अपेक्षा नव्हती. सिंघवी यांनी आपल्या म्हणण्यावर स्पष्टीकरण द्यावे अशा सूचना काँग्रेसने सिंघवी यांनी दिल्या. त्यानंतर सिंघवी यांनी यूटर्न घेतला. ते म्हणाले, 'सावरकर यांचा आंधळा राष्ट्रवाद आणि त्यांचा गांधीवादाला असलेला विरोध पाहता मी कधीही त्यांच्याशी सहमत होऊ शकणार नाही.'