करिनाचे कौतुक; आलियाने उच्चारला 'तो' शब्द - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 16, 2019

करिनाचे कौतुक; आलियाने उच्चारला 'तो' शब्द

https://ift.tt/35DMGbB
मुंबई: बऱ्याचदा बोलण्याच्या भरात आपण कुठे काय बोलतो याचे भान नसते. अभिनेत्री आलिया भटच्याबाबतही बऱ्याचदा असे घडते. बोलण्याच्या भरात, उत्साहात ती काहीतरी बोलते आणि ट्रोल होते. आलियासोबत हा किस्सा पुन्हा एकदा घडला आहे. करिनाचे कौतुक करताना आलियाने एक अश्लील शब्द उच्चारला आणि ट्रोलर्सने तिच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली. मामि चित्रपट महोत्सवातील एका चर्चासत्रात निर्माता दिग्दर्शक करण जोहर हा अभिनेत्री आणि आलिया भटसोबत संवाद साधत होता. त्यावेळी करण जोहरने करिनाबद्दल आलियाला प्रश्न विचारला. आलियाने त्याला उत्तर देताना करिनाचे कौतुक करण्यास सुरुवात केली. करिनाने एका पाठोपाठ एक चांगले चित्रपट केले आहेत आणि आजही ती चित्रपटात उत्साहाने काम करते. अनेकदा लोक म्हणतात की लग्नानंतर आयुष्य काहीसं आरामशीर, धीमं होतं. मात्र, करिनासोबत असं काही झालं नाही. तिला मूल झाल्यानंतरदेखील पूर्वीसारखी सक्रिय आहे. करिना ही माझ्यासाठीच नव्हे तर अनेकांसाठी प्रेरणा असल्याचे आलियाने सांगितले. आलियाने पुढं म्हटले की, आम्ही दररोज तिचे फोटो पाहतो आणि तिच्या जिम लूकचे कौतुक करतो. ती खूपच सुंदर आणि हॉट दिसते. तिचं सुंदर दिसणं कधी बंद होईल, असाही प्रश्न आम्हाला पडतो. इतकंच काय तर ट्रॅक पॅन्ट्स, चप्पल, टी-शर्ट अशा पेहरावातही ती सुंदर दिसत असल्याचे आलियाने म्हटले. आलिया करिनाच्या कौतुकात इतकी गुंग झाली की पुढंचा शब्द नकळत तिच्या तोंडातून बाहेर पडला आणि करिना हैराणच झाली. आलियाच्या या शब्दावर करण जोहर पाहतच बसला. करिनाने तोंडावर हात ठेवत हसू लपवण्याचा प्रयत्न केला. तर, उपस्थितांमध्ये हशा पिकला. नेमकं काय म्हणाली आलिया हे जाणण्यासाठी पाहा व्हिडिओ: