हे योगासन करा... राग, चिडचिड, चिंता विसरा! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 16, 2019

हे योगासन करा... राग, चिडचिड, चिंता विसरा!

https://ift.tt/32lc6IZ
सर्वांचेच आयुष्य आज धावपळ, ताण-तणावांनी भरलेलं आहे. प्रत्येकाचा दिनक्रम खूप धावपळीचा झाला आहे. रोजच्या या गडबडीमध्ये मन:स्वास्थ मात्र हरवत चाललं आहे अशी तक्रार सगळे जण करताना दिसतात. म्हणूनच आज जाणून घेऊ मन:शांती कशी मिळवू शकाल ते. त्यासाठी करता येईल ती . कसं कराल? ध्यान करता येईल अशा कोणत्याही आसनात बसा. कंबर आणि मान सरळ ठेवा. हाताचे तळवे दोन्ही गुडघ्यावर ठेवा. आता दोन्ही हातांच्या तर्जनी वाकवून त्या अंगठ्याला जोडा. इथे इतर तीन बोटं सरळ करून एकमेकांना जोडा. आता डोळे बंद करून ध्यानअवस्थेत बसून राहा. ही मुद्रा मेंदूच्या स्नायूंना बळ देते. त्यामुळे स्मरणशक्ती, धैर्य, एकाग्रता, मानसिक बळ वाढवणारी ही मुद्रा आहे. हे करत राहिल्यानं बुद्धीचा विकास होतो. डोकेदुखी आणि झोप न येण्याची समस्या तुम्हाला जाणवत असेल, तर त्यात हे लाभदायक आहे. मनाची चंचलता दूर करून, क्रोध, चिडचिड, सतत होणारी घाई, चिंता, ताणतणाव दूर ठेवण्यास मदत करते. ध्यान, प्राणायाम केली जाणारी ही मुद्रा आहे. ध्यान लवकर लावता येण्यासाठी ही मुद्रा सहाय्यकारक आहे. डॉ. सुरक्षित गोस्वामी