पार्ट्या सोडा,फिरा!सोनमचा बॉलिवूडकरांना सल्ला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 14, 2019

पार्ट्या सोडा,फिरा!सोनमचा बॉलिवूडकरांना सल्ला

https://ift.tt/2qbQxfR
मुंबई: सिनेजगतात होणाऱ्या पार्ट्यांविषयी नेहमी बोललं जातं. पण, सर्वांनाच या पार्ट्यांत रमायला आवडत नाही. अलीकडेच एका कार्यक्रमात तसं म्हणाली. 'कलाकारांना चित्रपट आणि पार्ट्या याव्यतिरिक्त काही दिसत नाही. त्यांनी मित्र-मैत्रिणी, कुटुंबासोबत फिरावं, पुस्तकं वाचावी जेणेकरून त्यांना बाहेरचं जगही कळेल', असं तिनं सांगितलं. ती म्हणाली, 'कलाकार म्हणून तुम्ही सतत काहीतरी नव्यानं शोधत राहिलं पाहिजे. बॉलिवूडमध्ये होणाऱ्या पार्ट्यांना हजेरी लावून तुम्हाला हे करता येणं शक्य नाही. या पार्ट्यांना हजेरी लावून तुम्ही केवळ त्या छोट्या जगात अडकून पडता आणि तुम्ही स्वत:साठी उत्तम असं फार काहीच करू शकत नाही. तुम्ही तुमच्या वेळेचं योग्य नियोजन केलं पाहिजे, तर तुम्हाला जीवनातील खरा आनंद लुटता येईल.' स्वत:च्या आयुष्याबद्दल बोलताना सोनम म्हणाली, 'मी माझ्या आयुष्यातील गोष्टींचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. मी त्यानुसार माझ्या वेळेचं नियोजन करते. त्यामुळे मला अनेक वेगळ्या गोष्टी करता येतात आणि त्यामुळेच मी माझ्या आयुष्यात सुखी, आनंदी आहे. एकदा गेलेली वेळ कधीच परत नाही, त्यामुळे तुम्ही किती वेळ कशासाठी खर्ची घालताय याबद्दल सजग असायलाच हवे. त्यामुळे वेळ पाळणं असो किंवा वेळेचा योग्य वापर...तुम्ही त्याचं नियोजन कसं करता हे महत्त्वाच आहे. ' सध्या ती नवरा आनंद अहुजा आणि मित्र-मैत्रिणींसोबत भटकंतीला गेली आहे. तिचे हे अनुभवाचे बोल किती कलाकार मनावर घेतात ते आता बघू. बॉलिवूडमध्ये नेहमीच आपली मतं परखडपणे मांडणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून सोनम कपूरकडे पाहिले जाते. अलीकडेच तिने स्त्रीवादावर केलेल्या एका कमेंटमुळे चर्चांना उधाण आलं होतं. स्त्रीवादावर आपले मत व्यक्त करत ढोंगी स्त्रीवादावर तिनं टीकास्त्र सोडले होतं. ब्रा जाळून मिशा वाढवणे म्हणजे स्रीवाद नाही, असे स्त्रीवादाचा खरा अर्थ सांगताना सोनमने आपली भूमिका मांडली. सोनम सांगते, 'तू स्त्रीवादी आहेस का असा प्रश्न मला १२ वर्षांपूर्वी कुणीतरी विचारला होता. तेव्हा मी हो, मी स्त्रीवादी आहे असे म्हटले होते. ते ऐकून मी अशा प्रकारे मत व्यक्त करणे योग्य नसल्याचे माझ्या पीआर टीमने मला सांगितले होते. असे म्हटल्याने तुम्ही पारंपरिक वेषभूषेत कधीही वावरत नसल्याने तुम्ही खऱ्या स्त्रीवादी नसल्याची टीका तुमच्यावर होऊ शकते असे ते मला म्हणाले. आज तर सर्वजण आपण स्त्रीवादी असल्याचे सांगतात. १२ ते १५ वर्षांपूर्वी कोणतीही अभिनेत्री स्पष्टपणे आपण स्त्रीवादी असल्याचे म्हणत नव्हती.'