पीएमसी प्रकरणी ३,८३० कोटींची मालमत्ता जप्त - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 15, 2019

पीएमसी प्रकरणी ३,८३० कोटींची मालमत्ता जप्त

https://ift.tt/2oHPMe6
वृत्तसंस्था, मुंबई: पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतील (पीएमसी) कर्जघोटाळा प्रकरणी ईडीने (सक्तवसुली संचालनालय) एकूण ३,८३० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये एचडीआयएलच्या प्रवर्तकांची दोन विमाने, महागड्या कार, क्रूझ आदीचा समावेश आहे, अशी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली. यातील चल व अचल मालमत्तेचे मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर काळा पैसा रोधक कायद्यातील (पीएमएलए) तरतुदींनुसार या मालमत्तांवर टाच आणली जाईल, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी अटक करण्यात आलेले एचडीआयएलचे वाधवान पितापुत्र, पीएमसी बँकेचे माजी अध्यक्ष वरियम सिंग यांची पोलिस कोठडी १६ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली. खातेदारांना दिलासा पीएमसी बँकेच्या खातेदारांना आता सहा महिन्यांच्या कालावधीत आपल्या खात्यांतून एकूण ४० हजार रुपये काढता येतील. रिझर्व्ह बँकेने सोमवारी ही माहिती दिली. बँकेवर निर्बंध घालताना ही मर्यादा १० हजार रुपये निर्धारित करण्यात आली होती. त्यानंतर ती २५ हजार रुपये करण्यात आली.