शर्लिन चोप्राला सांगितलं होतं 'कपडे काढ, न्यूड वॉक कर' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 9, 2019

शर्लिन चोप्राला सांगितलं होतं 'कपडे काढ, न्यूड वॉक कर'

https://ift.tt/2AWvvnA
मुंबई: ही तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओसाठी नेहमीच चर्चेत असते. शर्लिन आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या आयुष्यात घडलेल्या एका धक्कादायक प्रसंग तिनं सोशल मीडियावर शेअर केला. शर्लिन चोप्राच्या आयुष्यावर आधारित 'द लास्ट विश' ही शॉर्टफिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या शॉर्टफिल्मबद्दल माहिती देणारा एक छोटा टीझर तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत ती तिला आयुष्यात जे अनुभव आले त्यापैकी एक शेअर करताना दिसतेय. शर्लिनने ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम केलं त्यानेच तिच्याकडे 'कपडे काढ आणि न्यूड वॉक करून दाखव' अशी धक्कादायक मागणी केल्याचं ती यात सांगते. 'दिलसे चाहता था उसे, लेकिन उसने इज्जत की वाट लगा दी' असं म्हणत ती हा भयंकर अनुभव सांगायला सुरुवात करते. शर्लिनला न्यूड कॅटवॉक करायला सांगणारा तिचा हाच बॉयफ्रेन्ड आता तिच्याकडे काम करत असल्याचेही तिनं या व्हिडिओत सांगितलं आहे. तिच्या आयुष्यात घडलेलं असे अनेक किस्से या शॉर्टफिल्मच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 'द लास्ट विश' या शॉर्ट फिल्मचं लेखन, दिग्दर्शन खुद्द शर्लिन चोप्रा करणार आहे. याविषयी बोलताना शर्लिन म्हणाली, ' मला या शॉर्ट फिल्मकडून खूप अपेक्षा आहेत. या प्रोजेक्टमध्ये मला अभिनेत्री, लेखक, दिग्दर्शक अशा तिन्ही भूमिका पार पाडायच्या आहेत. या लघुपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. लवकरच ही शॉर्ट फिल्म प्रदर्शित होणार आहे.' 'प्लेबॉय' मॅगझीनच्या फ्रंटपेजवर झळकण्यासाठी शर्लिननं केलेल्या न्यूड फोटोशूटनं धुमाकूळ घातला होता. याशिवाय, शर्लिन चोप्रा आणि तिचा ‘कामसूत्र थ्रीडी’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा काही वर्षांपूर्वी रंगली होती. परंतु, चित्रपटाच्या टीमशी झालेल्या वादातून शर्लिनला ‘कामसूत्र थ्रीडी’ सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. विेशेष म्हणजे या चित्रपटाने भारतात प्रदर्शित होण्याआधीच थेट ‘ऑस्कर’ नामांकनाच्या शर्यतीत झेप घेतली होती. ऑस्करवारीसाठी सज्ज झालेल्या या चित्रपटात मिलिंद गुणाजी आणि मकरंद देशपांडे हे दोन मराठी अभिनेते या चित्रपटात प्रमुख भूमिकांमध्ये दिसलेत. बेस्ट मोशन पिक्चर, ओरिजनल स्कोर आणि ओरिजनल साँग अशा तीन विभागांत ‘कामसूत्र थ्रीडी’ नामांकनासाठी पाठवला होता. रुपेश पॉल यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाला चेन्नईतील संगीतकार सचिन आणि श्रीजीत यांनी संगीत दिले आहे. चित्रपटातील ‘हर हर महादेव’, ‘अय्यगिरी नंदिनी’, ‘सावरिया’, ‘आय फेल्ट’ आणि ‘ऑफ सोइल’, ही पाचही गाणी बेस्ट ओरिजनल साँग विभागाच्या नामांकनाच्या शर्यतीत होती.