प्रहार जनशक्ती पक्षाचा शिवसेनेला पाठिंबा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 27, 2019

प्रहार जनशक्ती पक्षाचा शिवसेनेला पाठिंबा

https://ift.tt/2pRDJv5
मुंबई: प्रहार जनशक्तीचे नेते आमदार आणि आमदार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन आपला पाठिंबा दिला आहे. शिवसेना नेते एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार बचू कडू आणि आमदार राजकुमार पटेल यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी अचलपूरचे आमदार असलेले बच्चू कडू आणि मेळघाटचे आमदार राजुकमार पटेल यांनी आपल्या पाठिंब्याचे पत्रच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहे. अचलपूर आणि मेळघाट या मतदारसंघात अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करणे अत्यंत आवश्यक असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. शेतातील पेरणी ते कापणी पर्यंतची कामे रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्याची प्रहार जनशक्तीची मागणी आहे. त्याच प्रमाणे दिव्यांग आणि आदिवासी बांधवांच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचाही प्रहार जनशक्तीचा आग्रह आहे. अचलपूर व मेळघाट मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यावरही प्रहार जनशक्तीने भर दिलेला आहे. याच मुद्द्यांवर प्रहार जनशक्तीने शिवसेनेला पाठिंबा दिला असल्याचे प्रहार जनशक्तीचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिकांच्या , आदिवासींच्या, शेतकऱ्यांच्या , मजुरांच्या, दिव्यांग्य बांधवांच्या प्रश्नांवर प्रहार आणि शिवसेनेची वैचारिक भूमिका समान असल्यानेच आपण शिवसेनेला पाठिंबा देत असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. प्रहार जनशक्ती पक्ष संपूर्ण ताकतीने शिवसेनेच्या सोबत राहणार असल्याची ग्वाही यावेळी बचू कडू यांनी दिली आहे. शिवसेनेचे संख्याबळ वाढले प्रहार जनशक्तीने पाठिंबा देण्यापूर्वी आशिष जैसवाल आणि नरेद्र बोंडेकर या दोन आमदारांनीही शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे शिवसेनेचे संख्याबळ आता ५६ वरून ६० वर पोहोचले आहे.