औरंगाबाद: आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर हल्ला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 17, 2019

औरंगाबाद: आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर हल्ला

https://ift.tt/32mz02x
औरंगाबाद: कन्नडचे अपक्ष आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर बुधवारी मध्यरात्री अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. यात जाधव यांच्या गाडीची व घरांच्या काचांची नासधूस झाली आहे. हल्ल्याच्या वेळी 'जय भवानी, जय शिवाजी' अशा घोषणा दिल्या जात होत्या. त्यामुळं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचं बोललं जात आहे. मात्र, अद्याप त्यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.