सौदी अरेबिया: अपघातात ३५ परदेशी नागरिकांच्या मृत्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 17, 2019

सौदी अरेबिया: अपघातात ३५ परदेशी नागरिकांच्या मृत्यू

https://ift.tt/32pg1ES
रियाद: सौदी अरेबियात बस अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रस्त्याचं खोदकाम करणाऱ्या मोठ्या यंत्राला बसची टक्कर झाल्यानं ही दुर्घटना घडली आहे. मदीनाहून १७० किमी अंतरावर हिजरा रोडवर अल-अखल गावाजवळ बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या खासगी बसमध्ये एकूण ३९ प्रवासी होते. जखमी प्रवाशांना जवळील अल-हमना या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून बस मधील अधिक प्रवासी हे परदेशी नागरिक असल्याची माहिती आहे. घटनास्थळी स्थानिक पोलिस प्रशासनाकडून मदतकार्य सुरू असून या अपघाताची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.