काश्मीर: अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी चकमक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 16, 2019

काश्मीर: अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी चकमक

https://ift.tt/2qdLEml
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. मंगळवारी रात्री उशिरा ही चकमक सुरू झाली. सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरले आहे. काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही बाजूने गोळीबार सुरू आहे. अनंतनागमधील बिजबेहरा परिसरात ही चकमक सुरू आहे. या ठिकाणी काही दहशतवादी लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी शोधमोहीम सुरू केली. या दरम्यान दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा दलाच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. शोपियानमध्ये ट्रक चालकाची हत्या दहशतवाद्यांनी सोमवारी शोपियानमध्ये एक ट्रक चालकाची हत्या केली. मूळचा राजस्थानचा असणारा हा ट्रक चालक सफरचंदाची वाहतूक करत होता. तर, गांदरबल परिसरात सुरक्षा दलाच्या जवानांनी हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. दहशतवादी कारवायांमध्ये ८० टक्के वाढजम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये २०१७च्या तुलनेत ८० टक्के वाढ झाली. तर, दहशतवादी ठार होण्यात २१ टक्के वाढ झाली. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार सीमेपलिकडून होणाऱ्या घटनांमध्ये ५ टक्के वाढ झाली. यावर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात घुसखोरीचे २३ प्रयत्न झाले. त्यापैकी सात वेळेस दहशतवादी सीमा ओलांडून काश्मीरमध्ये दाखल झाले.