गुगलवर एमएस धोनी सर्च करणं पडणार महागात - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 23, 2019

गुगलवर एमएस धोनी सर्च करणं पडणार महागात

https://ift.tt/2pJ6yJV
नवी दिल्लीः तुम्ही जर क्रिकेटप्रेमी असाल, किंवा धोनी याचे चाहते असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. जगभरात कोट्यावधी लोक महेंद्र सिंग धोनी उर्फ 'माही'चे चाहते आहेत. आपला आवडता क्रिकेटपटू धोनी याच्या बद्दलची माहिती मिळवण्यासाठी ते गुगलवर की वर्ड सर्च करत असतात. धोनीची इंत्यभूत माहिती गुगलवर सर्च करून मिळवणं सोप्पं असलं तरी ते आता अनेकांना महागात पडू शकतं. गुगलवर धोनी सर्च करणे त्याच्या चाहत्यांना महागात पडू शकते, असा इशारा एका अहवालातून देण्यात आला आहे. इंटरनेट सिक्यॉरिटी सॉल्यूशन्स कंपनी ने यासंबंधी एक रिपोर्ट नुकताच प्रसिद्ध केला आहे. यात याविषयीची माहिती दिली आहे. गुगलवर धोनी नावाच्या हजारो बनावट लिंक्स तयार करण्यात आल्या आहेत. गुगलवर धोनी नाव सर्च केल्यास त्याचे चाहते बनावट लिंक्सवर क्लिक करू शकतात. या लिंक्स ओपन केल्यास हॅकर्स धोनीच्या चाहत्यांना मोठे नुकसान पोहचवू शकतात. यात बँकेची माहिती, आर्थिक नुकसान पोहोचवणे, किंवा डेटा चोरी करणे, मोबाइल हॅक करणे, कम्प्यूटर हॅक करणे, यासारखी माहिती ते हॅक करू शकतात. धोनीच्या लोकप्रियतेचा गैरफायदा घेण्याचे हॅकर्सने ठरवल्याचे या लिंक्समधून दिसत असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. धोनीच्या चाहत्यांना फसवण्यात यावे यासाठी हॅकर्स गुगल सर्चची मदत घेत असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. रिपोर्टमध्ये म्हटलंय की, धोनीच्या नावानं गुगलवर बनावट लिंक्स खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या लिंक्सवर क्लिक केल्यानंतर हॅकर्स तुम्हाला व्हायरल असलेल्या साईटवर वळवू शकतात. हॅकर्स खूप आधीपासूनच हे करीत आहेत. यासाठी हॅकर्स अभिनेत्री सनी लिओनी, गौतम गुलाटी आणि क्रिकेटचा देव असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यासारख्या सेलिब्रेटिंच्या नावाच्या कीवर्डचा गैरवापर करू शकतात. परंतु, सध्या धोनी कीवर्ड हा सर्वात धोकादायक आहे, असे या अहवालात म्हटले आहे. गुगलवर सेलिब्रिटीच्या नावानं सर्च करणं धोकादायक आहे. गुगलवर कीवर्ड टाकल्यास बनावट लिंक्स ओपन होतात. त्यामुळे मोबाइल किंवा कम्प्यूटर हॅक होऊ शकतो, त्यामुळे सर्वांनी याबाबत जागरुक असणे गरजेचे आहे, असे या अहवालात म्हटले आहे.