
इस्लामाबाद: भारताने जर पाकिस्तानात वाहत येणाऱ्या नद्यांचे पाणी वळवण्याचा प्रयत्न केला, तर भारताच्या या कृत्याकडे 'उकसवणे' अशाच दृष्टीने पाहिले जाईल, असे वक्तव्य पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी केले आहे. , आणि सिंधू नदीचा प्रवाह बदलण्याच्या भारताच्या कोणत्याही प्रयत्नांना पाकिस्तान केवळ याच दृष्टीने पाहील असेही परराष्ट्र मंत्री कुरेशी म्हणाले. मंगळवारी शाह महमूद कुरेशी हे इस्लामाबादमध्ये सिंधू जल कराराबाबतच्या एका उच्चस्तरीय बैठकीला अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. या बैठकीनंतर अधिकृतपणे प्रसिद्ध केलेल्या निवेदनात कुरेशी यांनी भारताच्या नद्यांच्या पाण्याचा प्रवाह हदसण्याच्या धोरणावर आपली भूमिका मांडली आहे. या उच्चस्तरीय बैठकीत यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यावर देखील चर्चा करण्यात आली. पंतप्रधान मोदी यांनी, तसेच मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांनीही नदीचे प्रवाह बदलण्याबाबतही वक्तव्ये केली होती. या वक्तव्यांमुळे भारतातून पाकिस्तानात वाहत येणाऱ्या नद्यांचा प्रवाह बदलण्याचा प्रयत्न केला गेल्यास पाकिस्ताना भारताला योग्य ते उत्तर देईल, असेही कुरेशी म्हणाले. वाचा- महाराष्ट्र आणि हरयाणा राज्यांच्या विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नद्यांचे पाणी वळवण्याबाबत वक्तव्य केले होते. ज्या पाण्यावर भारताचा हक्क आहे, ते पाणी आम्ही पाकिस्तानात जाऊ देणार नाही, असे पंतप्रधान आपल्या प्रचार सभांदरम्यान म्हणाले होते. आमच्या नद्यांमधी आमच्या हिश्श्याचे पाणी वाहत पाकिस्तानात जात राहिले आणि आपली सरकारे ते गुपचूप पाहत राहिले. ज्या पाण्यावर आपला हक्क आहे, ते पाणी पाकिस्तानात जाऊ देत राहणे योग्य आहे का?, इथली शेती सुकलेली राहावीत आणि तिकडे मात्र हिरवाई पसरावी, हे असे कसे होऊ शकते?, असे सवाल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या हक्काच्या पाण्याची एक थेंब देखील मी पाकिस्तानात जाऊ देणार नाही, असा ठाम संकल्प जनतेपुढे मांडला. वाचा-