आयुषमानच्या 'चॉंद'ची भूमीनं उडवली खिल्ली - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 30, 2019

आयुषमानच्या 'चॉंद'ची भूमीनं उडवली खिल्ली

https://ift.tt/2Pt0kJ2
मुंबई: आणि भूमी पेडणेकर यांच्या बाला या चित्रपटाची बरिच चर्चा असून या चित्रपटाचा आणखी एक टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये भूमि टक्कल पडलेल्या आयुषमानची खिल्ली उडवताना दिसत आहे. या चित्रपटाच आयुषमान टक्कल पडल्यामुळं चिंतेत असतो तर भूमि तिच्या सावळ्या रंगामुळे चिंतेत असते. या चित्रपटातील अनेक काही गाणी प्रदर्शित झाली असून या टीझरमुळं या चित्रपटाची उत्सुकता आणखी प्रेक्षकांमध्ये वाढल्याचं पाहायला मिळत आहे. प्रदर्शित करण्यात आलेल्या या २० सेकंदाच्या टीझरमध्ये भूमी आयुषमानला चिडवताना दिसत आहे. आयुषमान एका वाण्याच्या दुकानात डोक्याला लावायचं तेल आणायला जातो, तेव्हा तिथं भूमी त्याला खिजवते. त्याच्या डोक्यावर टक्कल पडल्यानं भूमी त्याच्या डोक्यला 'चॉंद ' म्हणून खिजवण्याचा प्रयत्न करते. चौदवीका चांद, गलीमें आज चॉंद निकला अशी अनेक गाणी गाते. भूमीनं चिडवल्यानं आयुषमान चिडतो आणि तेलाच्या बाटल्या न घेता निघून जात असतो. यावेळी भूमी त्याला तेल लावण्याचा सल्ला देते. आयुषमाननं त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा टीझर शेअर केला आहे. नेहमीच हटके लुकमध्ये दिसणाऱ्या आयुषमानं या चित्रपटातही प्रेक्षकांना त्याच्या लुकनं आकर्षित केलं. आयुषमानच्या इतर चित्रपटांप्रमाणं या चित्रपटातही सहज साधा विषय वेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळणार आहे. अकाली केस गळतीशी झगडणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. टक्कल पडण्याच्या समस्येमुळं आत्मविश्वास गमावलेल्या तरुणाची ही कथा आहे. यात भूमी पेडणेकर आणि यामी गौतम यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या ७ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. 'बाला' आणि 'उजडा चमन' ची बॉक्सऑफिसवर टक्कर 'बाला' चित्रपट ७ नोव्हेंबरला प्रदर्शित होतोय तर, याच चित्रपटाच्या बरोब्बर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच ८ नोव्हेंबरला 'सोनू के टीटू की स्वीट'फेम सनी सिंगचा 'उजडा चमन' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. वयाच्या तिशीत टक्कर पडायला सुरुवात झालेल्या तरुणाची ही कथा आहे. अभिषेक पाठक यानं हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाचा विषय मिळता जुळता असल्यानं अनेक वाद निर्माण झाले. 'उजडा चमन'चे निर्माते कुमार मंगत पाठक यांनी 'बाला'च्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 'बाला'मधील तब्बल १५ दृश्ये 'उजडा चमन'मधील दृश्यांशी जुळणारी आहेत. याच कारणावरून कुमार पाठक हे न्यायालयात गेले होते. आयुष्मानचा 'बाला' आधी २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र, सिद्धार्थ मल्होत्राच्या 'मरजाँवा'शी स्पर्धा टाळण्यासाठी त्याची तारीख १५ नोव्हेंबर अशी घोषित करण्यात आली. मात्र, 'उजडा चमन'च्या निर्मात्यांनी ८ नोव्हेंबर ही प्रदर्शनाची तारीख ठरवून 'टकले की पहली असली फिल्म' अशी टॅगलाइन प्रसिद्ध केली. त्यामुळं सावध झालेल्या 'बाला'च्या निर्मात्यांनी नवी चाल खेळत आपला चित्रपट ७ नोव्हेंबरला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.