
हैदराबाद/भोपाळ: मॉब लिंचिंगबाबत केलेल्या वक्तव्यावरून एमआयएम प्रमुख आणि काँग्रेस नेते यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्या विचारधारेनं गांधी आणि तबरेज यांची हत्या केली, त्याहून अधिक भारताची बदनामी होऊच शकत नाही, असं ओवेसी म्हणाले. तर ज्या दिवशी भागवत एकजुटीच्या संदेशाचं पालन करतील त्या दिवशी आणि द्वेष यांसारख्या समस्या दूर होतील, असा टोला दिग्विजय सिंह यांनी लगावला. लिंचिंग हा शब्द भारतातील नसून, मॉब लिंचिंगसारखा प्रकार भारतात होत नाही, असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होते. त्यावर असदुद्दीन ओवेसी यांनी भागवत यांना टोला लगावला आहे. जमावाकडून झालेल्या हत्यांमधील पीडित भारतीय आहे. मॉब लिंचिंगमधील दोषींना कुणी माळा घातल्या होत्या? आपल्याकडे भाजप खासदार गोडसे समर्थक आहेत, असं ओवेसी म्हणाले. मॉब लिंचिंगसारख्या घटना रोखण्याबाबत भागवत काहीच सांगत नाहीत, असंही ते म्हणाले. 'गांधी आणि तबरेज अन्सारी यांच्या हत्या ज्या विचारधारेनं केल्या त्यापेक्षा जास्त बदनामी भारताची होऊ शकत नाही. भागवत हे जमावाकडून होणाऱ्या हत्या थांबवा असं सांगत नाहीत. त्याला लिंचिंग म्हणू नका असं ते सांगत आहेत,' असं ओवेसी म्हणाले. हिंदू राष्ट्राचा अर्थ गैरहिंदुंची गळचेपी. संविधानानुसार इंडिया म्हणजेच भारत आहे, असंही ओवेसी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. ...तरच मॉब लिंचिंगच्या घटना थांबतील! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी मोहन भागवत यांच्या एकजुटीच्या वक्तव्याकडे लक्ष वेधले. ज्या दिवशी भागवत एकजुटीच्या संदेशाचं पालन करतील त्यावेळी देशातील मॉब लिंचिंग आणि द्वेष यांसारख्या समस्या दूर होतील, असं सिंह म्हणाले. ज्या दिवशी मोहन भागवत एकजुटीचा संदेश देऊन त्याचं पालन करतील आणि प्रेम, सद्भावना आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मार्ग अवलंबतील त्या दिवशी सर्व समस्या दूर होतील. जमावाकडून होणाऱ्या हत्या थांबतील आणि देशातील द्वेषभावना दूर होईल. कोणतीच तक्रार राहणार नाही, असं सिंह म्हणाले. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव नेहमीच मॉब लिंचिंगच्या घटनांशी जोडले जाते, अशा घटनांशी संघाचा काहीही संबंध नाही, असे मोहन भागवत म्हणाले होते. लिंचिंग हा शब्द भारतातला नसून, मॉब लिंचिंगसारखा प्रकार भारतात होतच नाही, असेही ते म्हणाले होते. इतकी विविधता असूनही लोक भारतात शांततेत राहतात आणि असे उदाहरण भारताशिवाय जगात कुठेही मिळत नाही, असं ते नागपुरातील रेशीमबाग येथे आयोजित संघाच्या विजयादशमी उत्सवात बोलत होते. मॉब लिंचिंगसारखे शब्द वापरून हिंदू समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. विशिष्ट समुदायाप्रती सहानुभूती व्यक्त करण्यात येत असताना आपापसांत संघर्ष वाढवण्यात येत आहे, यापासून सतर्क राहण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले होते.